Saturday, February 6, 2021

" एक पडका वाडा "

गावाच्या शिवेवर
आहे पडका वाडा ।
मालक त्याचा म्हणे
कोणी होता बडा ।
म्हणतात तो प्रेमात
झाला होता वेडा ।
वेड पागलपणाचे
याला त्याला छेडा ।
प्रेयसी संगे एकदा
झाला त्याचा राडा ।
काटा तिनं काढला
लागला नाही छेडा ।
म्हणे भूत झाले त्याचे
रात्री अवतरतो वेडा ।
सापडेल जोही त्याला
वाढते त्याची पीडा ।
सगळेच आता भितात
भकास पडला वाडा ।
Sanjay R.


Friday, February 5, 2021

" भाग्य रेषा जीवनाची "

आहेच ती अनोखी
हास्य सदा तिच्या मुखी ।

येण्याने तिच्या घरात
घर बहरले आनंदात ।

सरले दुःख साऱ्यांचे
आले दिवस सुखाचे ।

एकेक पाऊल जीवनाचे
भासे साऱ्यांस गुणाचे ।

म्हणेल कोण सूड तिचा
लौकिक सर्वत्र असे जीचा ।

लेक अशी ती लाडाची
भाग्य रेषा ती जीवनाची ।
Sanjay R.


Thursday, February 4, 2021

" शापित ही वाट "

बघाना जरा हो
आयुष्याचा काय थाट ।
करायची पार
वळणा वळणाची वाट ।
सांगून कुठे येते
सागरात येणारी लाट ।
जाते घेऊन सारे
शक्ती तिची अफाट ।
शापित इथे सारे
कधी होईल पहाट ।
Sanjay R.

" कशाला होते ही रात्र "

मिनीचा एक भाबडा प्रश्न मला वारंवार विचार करायला भाग पाडत होता. तीच प्रश्न तर एकदम साधा आणि सरळ होता आणि उत्तरही त्याचे साधे सरळच होते. प्रश्न होता, कशाला होते ही रात्र ? आणि प्रश्नाचे उत्तर होते  पृथ्वी स्वतः भोवती आणि सूर्याभोवती फिरते, जेव्हा प्रथ्वी चा जो भाग सूर्याकडे येतो तिथे दिवस आणि पृथ्वीचा मागचा भाग जो सूर्याच्या विरुद्ध दिशेला असतो तिथे रात्र असते , पृथ्वी स्वतः भोवती फिरत असल्याने  आणि तिच्या स्वतःभोवती फिरायला जवळपास 24 तास लागत असल्याने पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते. हे कारण खरे असले तरीही मला मात्र तिचा तो प्रश्न स्वस्थ बसूच देत नव्हता. कशाला होते ही रात्र ?
पृथ्वीवर सजीवांची वस्ती आहे. दिवसा सारी सजीव प्रजाती आपले पोट भरण करण्यासाठी धडपड करते . त्यासाठी त्यांची भटकंती चालते. दिवसभऱ्याच्या त्या कष्टाने शरीर थकून जाते. त्यानंतर हवी शांत सहज झोप आणि ती झोप मिळावी म्हणूनच असेल कदाचित निरव शांत प्रिय रात्र त्यासाठी येत असावी.  रात्री सगळेच कसे शांत असते. सूर्याची ऊर्जाही रात्री लोप पावते. टिकून असते फक्त चंद्र आणि ताऱ्यांचा शीतल मंद प्रकाश, हळुवार वाहणारा शांत वारा आणि सगळीकडे असणारी सामसूम . आणि अशा या शांत झोपेत सुखद स्वप्ने मनाला सुखावून जातात.

मात्र कधी कधी ही शांत असणारी रात्रही आपल्या हृदयाचे ठोके वाढवून जाते. शांत हवेत होणारी झाडांच्या पानांची सळसळ ही मनाचा वेध घेऊन जाते. रात्रीत चमचम करणारे काजवेही डोक्यात चमक देऊन जातात. रातकिड्यांचे किर किर होणारे आवाज भीती वाढवून जातात. अंधार पुढे काय आहे हे दिसत नसतानाही वेगवेगळे आभास थरकाप देऊन जातात. शांत शीतल वाराही घामाच्या धारांमध्ये माणसाला ओला चिंब भिजवून जातो.  आणि मग माणूस भीतीने थरथरायला लागतो. त्याला त्याचा एकटेपणा जाणवायला लागतो. आणि मग त्यांच्यापुढे असंख्य विविध आकाराची विविध प्रकारांची भुतं विक्षिप्त पणे नाचायला लागतात. शांत वाटणारी रात्र मग तुम्हास अशांत करून जाते.
Sanjay R.


Wednesday, February 3, 2021

" भयानक ती रात्र "

परत एकदा तशीच 
अमावसेची तीच रात्र ।
गच्च काळोखात चालले
तोटके मात्रिकाचे मंत्र तंत्र ।
अंगारे धुपरे होते सुरू
कसले जीवघेणे सत्र ।
भुतातकीचा खेळ सारा
ज्वाळानी भरले अग्निहोत्र ।
आकाशात चांदण्यांनी
होते व्यापले सारे छत्र ।
अचानक झाला प्रकाश
दिपले साऱ्यांचे नेत्र ।
परत झाला अंधार काळा
अग्नी तसा तिथेच मात्र ।
पडला सडा पुष्पांचा
देह उरले गलितगात्र ।
कसले कशाचे सामर्थ्य
ढोंगी बाबाचे ते पात्र ।
Sanjay R.