Tuesday, February 2, 2021

" शब्द शेवाटाचा "

अजूनही आठवतो मला
तुझा तो शब्द शेवटाचा ।
 सारेच बदलले जग माझे
नव्हता आधार जगण्याचा ।

सांग मंथन किती करायचे
गुन्हा काय होता कुणाचा ।
सोडून तू गेलीस आणि
हरलो मंत्र मी जीवनाचा ।

आज कसा तो अचानक
उठला पडदा आठवणींचा ।
वाटे मज तू उभी पुढ्यात
झाला अंत त्या रडगाण्यांचा ।

ये सखे तू परतून आता
नाद होऊ दे हसण्याचा ।
क्षण क्षण हा फुलवू आता
उत्सव तुझ्या या असण्याचा ।
Sanjay R.

Monday, February 1, 2021

" शब्द माझे "

शब्द माझे भावनांचा ओघ
येती कधी झरझर पुढ्यात ।
कधी नकळे रुसून बसती
मनही माझे असते कोड्यात ।
छंद लागला मला तुझाच
काढील कोणी मजला वेड्यात
तुझ्या विना तर सुचेना मजला
रमतो मी तर तुझ्याच ओढ्यात ।
Sanjay R.

" नाते तुझे माझे "

तुझे आणि माझे
अनोखे हे नाते ।
जशी दूर कोकिळा
गीत मधुर गाते ।
साद ऐकून सख्याची
सखी व्याकुळ होते ।
तोडून सारे बंध ती
वेडी प्रेमात होते ।
कृष्णाच्या संगे राधा
विसरून सारे जाते ।
दरवळे प्रीतीचा गंध
हेच तुझे माझे नाते ।
Sanjay R.


Saturday, January 30, 2021

" ती अजूनही तिथेच आहे "

जग पोहचले मंगळावर
चंद्र तर घरचाच झाला ।
आकाशच सर करतोय आता
जमाना व्हर्चुअल चा आला ।

झपाट्याने पुढे जातोय सारे
काळ जुना इतिहास झाला ।
आचार विचार सारे बदलले
माणुसकीचा तर झाला पाला ।

अजूनही मात्र तू आहे तिथेच
बंधनांचा का तुझ्यावरच घाला ।
हो मुक्त टाक तोडून ही बंधने
चिंता तुझी गं आहे कुणाला ।
Sanjay R.


Friday, January 29, 2021

" शेवटची भेट "

आठवत नाही आता
झाली कधी शेवटची भेट ।
वर्षामगून वर्ष गेले
भेटतोय आजच आपण थेट ।
उत्तर नाही डोक्यात
झालो का इतके आपण लेट ।
सुरवात कशी करायची
याचाच मनात असावा वेट ।
मन झाले आता मोकळे
उघडले भिंतींना लागलेले गेट ।
उतरला भार सारा
सम्पवू नकोस आता हा मेट ।
Sanjay R.