Wednesday, January 27, 2021
" रात्र "
नेहमीचाच तिचा परिपाठ
अगदी वेळेवर ती येते ।
निजवून साऱ्या जगाला
हळूच निघून जाते ।
जाण्याने मात्र तिच्या
होतात सारे जागे ।
चंद्र आणि चांदण्या
असतात तिच्या मागे ।
नाते तिचे या धरेशी
बांधले अंधाराशी धागे ।
थकलेल्यास देण्या विसावा
येई रात्र उजेडाच्या मागे ।
Sanjay R.
" हरवली माणुसकी "
शोधू कुठे मी सांगा आता
खरच का हरवली माणुसकी ।
अब्जावधीची संख्या इथे
कुणातच नसेल का आपुलकी ।
कालच तर घडले दिल्ली दर्शन
रिकाम्या डोक्याची रिकामी खोकी ।
माणूस माणसावरच चवताळून येतो
माणुसकीच तिथे पडते फिकी ।
म्हणतात कुणी मला काय त्याचे
करेल मरेल काय उरेल बाकी ।
उद्धवस्त होतेय जीवनच आता
आहे हीच अंतयात्रेची झाकी ।
Sanjay R.
Tuesday, January 26, 2021
Saturday, January 23, 2021
" अनोळख्या वाटा "
सगळ्याच वाटा इथे अनोळख्या
जायचे कुठे ते ठरलेच नाही ।
एक एक पाऊल पडते पुढे
आलो कुठे मी कळलेच नाही ।
लागलेत किती ते खाच खळगे
पडलो झडलो मोजलेच नाही ।
वणवण चाले ही पोटासाठी
अजून पोट ही भरलेच नाही ।
दशा मनाची दिशा जगण्याची
इच्छा कुणाचीच हरली नाही ।
Subscribe to:
Comments (Atom)