Saturday, January 23, 2021

" अनोळख्या वाटा "

सगळ्याच वाटा इथे अनोळख्या
जायचे कुठे ते ठरलेच नाही ।
एक एक पाऊल पडते पुढे
आलो कुठे मी कळलेच नाही ।

लागलेत किती ते खाच खळगे
पडलो झडलो  मोजलेच नाही ।
वणवण चाले ही पोटासाठी
अजून पोट ही भरलेच नाही ।

दशा मनाची दिशा जगण्याची
इच्छा कुणाचीच हरली नाही ।

दूर कुठे या सम्पतील वाटा  
वेळ अजून ती सरली नाही ।
Sanjay R.


Friday, January 22, 2021

" तुझा भास तुझाच ध्यास "

तुझाच ध्यास
तुझा आभास ।
जीवनात तूच
आहेस खास ।
तुझ्या विनातर
थांबेल श्वास ।
सोडू कसा मी
केलेत प्रयास ।
होतो मनाला
माझ्याच त्रास ।
छळतात मज
तुझेच भास ।
कळले का तुला
तूच आहे खास ।
सदैव मजला
तुझाच ध्यास ।
Sanjay R.



Thursday, January 21, 2021

" तू अजूनही आहेस "

तू अजूनही आहेस
मनात तिथेच माझ्या ।
विसरेल कसा मी
नजर वाटेवर तुझ्या ।

दुरूनच दिसताच तू
स्पंदने वाढतात हृदयाची ।
बोलावं तुझ्याशी शब्द दोन
इच्छा असते ही मनाची ।

केव्हा कशी तू दूर झाली
अजूनही ते कळले नाही ।
वाटतं,
कालच तर भेटलो होतो
आज अजून का आली नाही ।

वेडच असतं ना हे मन
प्रेमही त्याला वेडावतं ।
व्यथित होतं हृदय मात्र
आठवणीतच ते सुखवतं ।
Sanjay R.


Wednesday, January 20, 2021

" बंधन "

जीवनच हे बंधन
मुक्त कोण इथे ।
पृथ्वीला सूर्याचे तर
झाडाला मातीचे ।
लेकराला मातेचे 
नि पोराला बापाचे ।
बहिणीला भावाचे
पत्नीला पतीचे ।
बंधनात बांधले सारे
मुक्त कुठे वारे ।
सागराला ही हो
आहेत ना किनारे ।
आकाशात बघा
आहेत चन्द्र तारे ।
दिवसा मात्र ते
होतात ना बिचारे ।
पवित्र तो धागा
बंधनात जरी सारे ।
मुक्तीच्या श्वासाला
सुटते बंधन सारे ।
Sanjay R.


Tuesday, January 19, 2021

" होणार आता शाळा सुरू "

होणार आता शाळा सुरू
चला मुलांनो तयारी करू ।

ड्रेस शाळेचा पुस्तक काढा
आठवतो का आता बेेेचा पाढा ।

आहेेेत कुठे ते शु आणी टाय
वह्या कोऱ्याच करायचे काय ।

सवय सुटली आता अभ्यासाची
तारीख जवळ आहे परीक्षेची ।

होमवर्क टर्मवर्क काय काय असेल
जुनी मजा तिथे नक्कीच नसेल ।

करू कसेही सगळेच म्यानेज ।
टीचर मित्र हवे मजला नॉलेज ।
Sanjay R.