Saturday, January 9, 2021

" आमच्या गावचा शिरपा "

ओयखता का हो तुम्ही
आमच्या गावचा शिरपा ।
काय म्हनावं बा त्याले
एका डोळ्यानं तिरपा ।

करून मोल मजुरी 
थो कसा तरी जगते ।
पोरी त्याले सात पर
वाट पोराचीच पायते ।

लेकरायची न्हाई सोय
पोरगच पायजेन म्हनते ।
बायकोबी तशीच त्याची
तिले बी काय कयते ।

लेकरायचे हाल पाहून
मन साऱ्यायचं जयते ।
पर शिरपा न्हाई मानत
थो पोरकडच पयते ।
Sanjay R.


Friday, January 8, 2021

" करू नको तू परका मजसी "

मनाने मी हा झालो तुझा
विचार असतो मनात तुझा ।
बंध म्हणू की ऋणानुबंध 
आस मनाची आभास तुझा ।
चाले निरंतर एकच ध्यास
सांगते स्वप्नही निरोप तुझा ।
हसली रुसली मनात बसली
जगतो आठवत श्वासही तुझा ।
करू नको तू परका मजसी
हवा मजला सहवास तुझा ।
Sanjay R.


Thursday, January 7, 2021

" एक पाऊल पाहिले "

एक पाऊल पहिले 
नक्की बसवेल जम ।
व्यर्थ नाही हो जात
केलेले सारे श्रम ।
नका बाळगू आता
मनात कुठला अहम ।
टाका काढून थोडा
असेल जो भ्रम ।
ठेवा शांत चित्त आणि
नजर थोडी नम ।
यश असेल हाताशी
जीवनाचा हाच क्रम ।
Sanjay R.

Wednesday, January 6, 2021

" आहेत ही मेंढरं "

एका मागे एक सारे
जशी आहेत ही मेंढरं ।
नाही उरले विचार
डोक्यात भिनल वारं ।
प्रवाह नेईल जिकडे
वाहते तिकडे सारं ।
नाही कशाला आधार
जीवन झाले भार ।
बदलले किती आचार
उद्धवस्त सारे संसार ।
थांबतो कोण आता
झेलू सारेच प्रहार ।
Sanjay R.




Tuesday, January 5, 2021

" चैन कुठे या मनाला "

हरली तहान भूक 
चैन कुठे या मनाला ।

सारखी येते आठवण
सांगू आता कुणाला ।

लक्ष लागेना कशात
ध्यास तुझा जीवाला ।

येना सखे तू परतून
नको थांबवू श्वासाला ।
Sanjay R.