Thursday, December 24, 2020

" चूल आणि मूल "

उरलेच कुठे आता 
ते प्राचीन आचार ।
चूल आणि मुल 
वाले सरले विचार ।


बरोबरीने माणसाच्या 
बघा कशी ती लढते ।
स्त्री नाही  कशातच 
उरली आता लाचार ।

नाही कुठेच मागे 
कुठल्याही शिक्षणात ।
सदैव तत्पर असते 
प्रत्येक नोकरी कामात ।

नेहमीच असते पुढे 
प्रत्येक अवघड कार्यात
नाव लौकिक तिचा 
आहे साऱ्या जगात ।

घर संसार असो वा 
असो मुलांचा सांभाळ ।
संपला आता तो 
जुन्या विचारांचा काळ ।

आहे भूषण समाजाचे
नाही तिला विराम ।
कर्तुत्वाला तिच्या आम्ही
करतो सारेच सलाम ।
Sanjay R.



Wednesday, December 23, 2020

" मी आणि तू "

मी आणि तू

मी.......
मी मी ची गर्दी इथे
हरवलो त्यात मी ।
सांगतंय कोणी तू
तोच का आहे मी ।
मि ला मी शोधतोय
आहे कुठे तो मी ।
बघतो अंतरात जेव्हा
मी तर आहे तोच मी ।

तू......
तू ला मी शोधू कुठे
तू इथे की तू तिथे ।
आहेस तू , तू जिथे
शोधले मी तुला तिथे ।
तू मनात तू ध्यानात
तू क्षणात तू कणात ।
तू तुझ्यात तू माझ्यात
आहे माझ्या तू हृदयात ।
Sanjay R.


Tuesday, December 22, 2020

" पडद्यामागचा बाप "

बाप घराचा आधार
उचले सारा भार ।
करून कष्ट अपार
करी उभा संसार ।
झेलतो सारे वार
मानतो कुठे हार ।
अव्यक्त ते  विचार
तीक्ष्ण लागे धार ।
वाटे करतो प्रहार 
अंतरात बंद सार ।
Sanjay R.

" छंद हा वेगळा "

काहूर मनात विचारांचे
मिळे शब्दांना आधार ।
छंद हा वेगळा किती
कविता जीवनाचा सार ।

शब्दच करी सारे व्यक्त
आयुष्य सुख दुःखाचा भार ।
डोळ्यात आसवांची गाथा
आणि देई लेखणी आकार ।

चकमक होता शब्दांची
तुटती सारेच विकार ।
हुंदका येई अंतरातून
शब्दपुढे शब्द लाचार ।
Sanjay R.


Monday, December 21, 2020

" काहूर उठलं पुन्हा "

थंडी सुरू झाली कशी
यात सांग कुणाचा गुन्हा ।
आठवण आली तुझी
नि काहूर उठलं पुन्हा ।
आहेस कुठे तू सांगना
माझा मीच झालो सुना ।
बघतो दूर  तिथे शुन्यात
घाव आहे कुठे तो जुना ।
Sanjay R.