Wednesday, December 23, 2020

" मी आणि तू "

मी आणि तू

मी.......
मी मी ची गर्दी इथे
हरवलो त्यात मी ।
सांगतंय कोणी तू
तोच का आहे मी ।
मि ला मी शोधतोय
आहे कुठे तो मी ।
बघतो अंतरात जेव्हा
मी तर आहे तोच मी ।

तू......
तू ला मी शोधू कुठे
तू इथे की तू तिथे ।
आहेस तू , तू जिथे
शोधले मी तुला तिथे ।
तू मनात तू ध्यानात
तू क्षणात तू कणात ।
तू तुझ्यात तू माझ्यात
आहे माझ्या तू हृदयात ।
Sanjay R.


Tuesday, December 22, 2020

" पडद्यामागचा बाप "

बाप घराचा आधार
उचले सारा भार ।
करून कष्ट अपार
करी उभा संसार ।
झेलतो सारे वार
मानतो कुठे हार ।
अव्यक्त ते  विचार
तीक्ष्ण लागे धार ।
वाटे करतो प्रहार 
अंतरात बंद सार ।
Sanjay R.

" छंद हा वेगळा "

काहूर मनात विचारांचे
मिळे शब्दांना आधार ।
छंद हा वेगळा किती
कविता जीवनाचा सार ।

शब्दच करी सारे व्यक्त
आयुष्य सुख दुःखाचा भार ।
डोळ्यात आसवांची गाथा
आणि देई लेखणी आकार ।

चकमक होता शब्दांची
तुटती सारेच विकार ।
हुंदका येई अंतरातून
शब्दपुढे शब्द लाचार ।
Sanjay R.


Monday, December 21, 2020

" काहूर उठलं पुन्हा "

थंडी सुरू झाली कशी
यात सांग कुणाचा गुन्हा ।
आठवण आली तुझी
नि काहूर उठलं पुन्हा ।
आहेस कुठे तू सांगना
माझा मीच झालो सुना ।
बघतो दूर  तिथे शुन्यात
घाव आहे कुठे तो जुना ।
Sanjay R.

Friday, December 18, 2020

" देऊ कसे सोडून सारे "

प्रवास हा जीवनाचा
देऊ कसे सोडून सारे ।
जीव छोटासा मुंगीचा
हट्ट किती जगण्याचा ।
कण कण गोळा करी
विचार कुठे मरणाचा ।
जीवन हे अनमोल किती
शोधू क्षण आनंदाचा ।
सारून दूर दुःख सारे
करू प्रयास हसण्याचा ।
बघ जरा तू दूर गगनात
ताप किती त्या सूर्याचा ।
दूर सरतो अंधार सारा
शीतल प्रकाश चंद्राचा ।
उठ मानवा जागा हो
सोड विचार जाण्याचा ।
Sanjay R.