बाप घराचा आधार
उचले सारा भार ।
करून कष्ट अपार
करी उभा संसार ।
झेलतो सारे वार
मानतो कुठे हार ।
अव्यक्त ते विचार
तीक्ष्ण लागे धार ।
वाटे करतो प्रहार
अंतरात बंद सार ।
Sanjay R.
काहूर मनात विचारांचे
मिळे शब्दांना आधार ।
छंद हा वेगळा किती
कविता जीवनाचा सार ।
शब्दच करी सारे व्यक्त
आयुष्य सुख दुःखाचा भार ।
डोळ्यात आसवांची गाथा
आणि देई लेखणी आकार ।
चकमक होता शब्दांची
तुटती सारेच विकार ।
हुंदका येई अंतरातून
शब्दपुढे शब्द लाचार ।
Sanjay R.