Monday, December 21, 2020

" काहूर उठलं पुन्हा "

थंडी सुरू झाली कशी
यात सांग कुणाचा गुन्हा ।
आठवण आली तुझी
नि काहूर उठलं पुन्हा ।
आहेस कुठे तू सांगना
माझा मीच झालो सुना ।
बघतो दूर  तिथे शुन्यात
घाव आहे कुठे तो जुना ।
Sanjay R.

Friday, December 18, 2020

" देऊ कसे सोडून सारे "

प्रवास हा जीवनाचा
देऊ कसे सोडून सारे ।
जीव छोटासा मुंगीचा
हट्ट किती जगण्याचा ।
कण कण गोळा करी
विचार कुठे मरणाचा ।
जीवन हे अनमोल किती
शोधू क्षण आनंदाचा ।
सारून दूर दुःख सारे
करू प्रयास हसण्याचा ।
बघ जरा तू दूर गगनात
ताप किती त्या सूर्याचा ।
दूर सरतो अंधार सारा
शीतल प्रकाश चंद्राचा ।
उठ मानवा जागा हो
सोड विचार जाण्याचा ।
Sanjay R.

Thursday, December 17, 2020

" दिव्यातली वात "

जळते जेव्हा दिव्यात वात
तेलाची असते वातीला साथ ।

करूनीया पुढे प्रकाश हात
 करतो कसा अंधाराचा घात ।

अशीच सरते आयुष्याची रात
उजेडाची काळोखावर मात ।

रात्र निघता मग होते प्रभात
चांदणी कशी ती होते अनाथ ।
Sanjay R.

Wednesday, December 16, 2020

" माझी कविता "

आठवण आली तुझी की
सुचतात मला शब्द ।
नसतीस तू सोबतीला तर
बसलो असतो ना स्तब्ध ।
प्रयत्न तर खूप करतो
माहीत नाही कसे हे प्रारब्ध ।
हवी तुझी साथ मला
तुझ्यातच व्हायचं मला मुग्ध ।
Sanjay R.

" क्षण चार आनंदाचे "

घ्या जगून 
दिवस चार हे जीवनाचे ।

धडपड जगण्याची
दिवस सारेच हे कष्टाचे ।

दिवस एक तो
येई आमंत्रण मरणाचे ।

उरेल मागे
सुटेल क्षण ते जगण्याचे ।

हवे मनाला
काहीच धागे ते उरण्याचे ।

सुख दुःख सोबती
वेचू चला क्षण आनंदाचे ।
Sanjay R.