जळते जेव्हा दिव्यात वात
तेलाची असते वातीला साथ ।
करूनीया पुढे प्रकाश हात
करतो कसा अंधाराचा घात ।
अशीच सरते आयुष्याची रात
उजेडाची काळोखावर मात ।
रात्र निघता मग होते प्रभात
चांदणी कशी ती होते अनाथ ।
Sanjay R.
ती रात्र अंधाळलेली
गेली कशी मज कळलेच नाही ।
धुंद होती ती हवा,
मदहोश होते मन कळलेच नाही ।
रात्रीस बहरली रातराणी
दरवळलेला गन्ध कळलाच नाही ।
दोन भावनांचा मेळ
प्रणयाचा तो खेळ कळलाच नाही ।
सर्वस्व झाले एकरूप
बंधन कशाचे आता उरलेच नाही ।
तू फक्त आणि मी
सत्य जीवनाचे कळले सारे काही ।
Sanjay R.