होऊ नको हताश
चल पुढे जरा ।
विजय दारात आहे
वेळ करा वा मरा ।
दुःख सुखाची पायरी
येतो नशिबाचा फेरा ।
धैर्य नको तू सोडू
तुटेल कठीण तो घेरा ।
सुख येईल जवळ
जगण्याची ही तऱ्हा ।
Sanjay R.
Monday, December 7, 2020
" नको होऊ हताश "
Sunday, December 6, 2020
" बालपणातली मैत्री "
बालपण असतेच अनोखे
चाले दंग मस्ती मित्रांसंगे ।
ना कशाची चिंता न काम
खेळा पळा चाले फक्त दंगे ।
मैत्री बालपणातली मस्त
मग रोजच चालायचे पंगे ।
शाळा असोवा मैदान खेळाचे
मस्तीत असायचे सारेच चंगे ।
खायचे असो वा खेळायचे
वाटून घ्यायचे साऱ्या संगे ।
वाटत अजून यावेत दिवस ते
हवेत मित्रही तसेच लफंगे ।
Sanjay R.
Saturday, December 5, 2020
" तू स्वप्न परी "
तू स्वप्नातली परी
शोभते इंद्र दरबारी ।
सौंदर्याची मालिका
वेशभुषा भरजारी ।
चमचमते अलंकार
रत्न माणके भारी ।
भासे मज तू अशी
कोण कुठली नारी ।
रुणझुण करी पैंजण
आभास मनोहारी ।
नित्य बघावे तुज
होईल तीच वारी ।
लुटले हृदय माझे
वाट बघतो दारी ।
Sanjay R.
Friday, December 4, 2020
" मोडू नको रे सख्या "
मोडू नको रे सख्या
लग्नाचा हा बंध ।
लाव जीव थोडा
बघ येईल सुगंध ।
नव्हती ओळख
कुठली पाळख ।
तरीही झाले रे मी
बघ तुझ्यातच धुंद ।
नको करू काळोख
होईल मी अंध ।
जडली रे प्रीत आता
तूच माझा आनंद ।
Sanjay R.
" मनात आशा "
जगतो ठेऊन मनात आशा
कुठे मिळेल कुठली दिशा ।
दिवस रात्र पळापळ नुसती
वाजतो कष्टाचा ढोल ताशा ।
ध्येय अंतिम काय कुणाचे
पैसा पैसा बस एकच भाषा ।
दिवस रात्री किती सरल्या
उरल्या शेवटी काळ्या रेषा ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)