" माझे मन "
माझ्या कविता - By Sanjay Ronghe
Saturday, December 5, 2020
" तू स्वप्न परी "
तू स्वप्नातली परी
शोभते इंद्र दरबारी ।
सौंदर्याची मालिका
वेशभुषा भरजारी ।
चमचमते अलंकार
रत्न माणके भारी ।
भासे मज तू अशी
कोण कुठली नारी ।
रुणझुण करी पैंजण
आभास मनोहारी ।
नित्य बघावे तुज
होईल तीच वारी ।
लुटले हृदय माझे
वाट बघतो दारी ।
Sanjay R.
Friday, December 4, 2020
" मोडू नको रे सख्या "
मोडू नको रे सख्या
लग्नाचा हा बंध ।
लाव जीव थोडा
बघ येईल सुगंध ।
नव्हती ओळख
कुठली पाळख ।
तरीही झाले रे मी
बघ तुझ्यातच धुंद ।
नको करू काळोख
होईल मी अंध ।
जडली रे प्रीत आता
तूच माझा आनंद ।
Sanjay R.
" मनात आशा "
जगतो ठेऊन मनात आशा
कुठे मिळेल कुठली दिशा ।
दिवस रात्र पळापळ नुसती
वाजतो कष्टाचा ढोल ताशा ।
ध्येय अंतिम काय कुणाचे
पैसा पैसा बस एकच भाषा ।
दिवस रात्री किती सरल्या
उरल्या शेवटी काळ्या रेषा ।
Sanjay R.
Thursday, December 3, 2020
" नवी सकाळ नवी आशा "
रात्र होती स्वप्नांची
नकळतच सरली ।
पहाटेचा गजर झाला
झोपही मग हरली ।
उघडले डोळे जेव्हा
रात्र दूर जाऊन दडली ।
बघता दूर आकाशी
गाठ सूर्याशी घडली ।
परसात गुलाब फुलला
होती वेडावत लाली ।
चिवचिवत होते पक्षी
सांगे मज सकाळ झाली ।
मनोहारी स्वप्न माझे
आठवण तयाची आली ।
बघून स्वप्न साक्षात ते
पसरले हास्य गाली ।
Sanjay R.
Wednesday, December 2, 2020
" ट्वेन्टी ट्वेन्टी "
ट्वेन्टी ट्वेन्टी आले
कळलेच नाही कसे गेले ।
सगळेच होते घरात
वातावरण भीतीचे झाले ।
कोरोनाने केला घात
नोकरी धंदे बुडाले ।
हास्य मुखावरचे कसे
पावलो पावली हिरावले ।
नाही शाळा नाही खेळ
मुलंही किती कंटाळले ।
ऑनलाईन ऑनलाईन
जीवनच कसे झाले ।
नको वाटतं आता सारं
पुरे वर्षच असेच गेले ।
देवा मिळू दे सुख आता
पहा वर्ष नवीन आले ।
Sanjay R.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)