Wednesday, November 18, 2020

" टाईपरायटर "

गेले ते दिवस केव्हाच
आता ऑफिसच बदलले ।
खडखडायचे टाईप रायटर
आवाज सारेच विसरले ।

आला कॉम्प्युटर चा जमाना
ऑफिस झालेत सुने ।
टाईप रायटर पेन फाईल
सगळेच झाले जुने ।

स्टेनो पण आता हटले
हातात मोबाईल आले ।
रेकॉर्डिंग फोटोग्राफी
सगळेच किती इझी झाले ।

भार कामाचा हलका झाला
करा वर्क फ्रॉम होम ।
घरबसल्या होते सारेच
टेक्नॉलॉजीने कामात जोम ।
Sanjay R.


" सेल्फी "

थोडंच अगोदर बघा
आपण होतो कुठे ।
फोटो काढायला होते
स्टुडिओ मोठं मोठे ।

डोळे दिपायला असायचे
प्रकाशाचे लाईट तिथे ।
फोटोग्राफरने रेडी म्हणता
हसायचे थोडे खोटे ।

आजकाल आले मोबाईल
काढलं सेल्फी जिथे ।
वेळ नाही काळ नाही
फोटो बघा त्वरित भेटे ।

रेडी व्हायची गरज नाही
नेहमीच सारे तयार इथे ।
सेल्फी काढा करून जरा
वेडे वाकडे तोंड मोठे ।
Sanjay R.

Monday, November 16, 2020

" प्रवास अखंड जीवनाचा "

चाले अखंड प्रवास
मुक्त या जीवनाचा ।
सुर्योदय ते सूर्यास्त
प्रकाश असतो सूर्याचा ।

होता रात्र अंधारी
भरे दरबार चांदणीचा ।
घेता निशा रूप वेगळे
सत्कार होई चंद्राचा ।


दूर वाजती ढोल नगारे
आवाज रातकिड्यांचा ।
घेऊन मशाल हाती निघे
जत्था मग काजव्यांचा ।

अनोखे ते दृश्य आगळे
फुले मोगरा रात्रीचा ।
दरवळ चाले धरेवरती
हसऱ्या त्या रातरणीचा ।

येता जाग मग सूर्याला
क्षण असे तो पहाटेचा ।
सारेच जाती दूर कुठे ते
होतो उदय उजेडाचा ।
Sanjay R.

" रम्य दिवस ते कॉलेजचे "

अजूनही आठवतात हो मला
रम्य दिवस ते कॉलेजचे ।
कॉलेज सरले नोकरी आली
चाळतो पाठ जीवनाचे ।

हसायचे आणि खेळायचे
कधी बिनधास्त भटकायचे ।
मित्र असायचे संगतीला
पाठीराखे तेच जीवनाचे ।

गाडा संसाराचा येता हाती
सैल झाले नाते मैत्रीचे ।
आठवण मात्र निघत नाही
अस्तित्व मनात मित्रांचे ।
Sanjay R.


" भाऊ बहीण "

भाऊ आणि बहीण

नाते आहे रक्ताचे ।


प्रेमाचे आणि भावनांचे

बंध आहेत जीवनाचे ।


बांधून धागा प्रेमाचा

पाठीशी ती असण्याचे ।


खोटे मोठे कधीतरी

भाव दाखवी रुसण्याचे ।


वाट पाहते भावाची

निमित्य असते दिवाळीचे ।


जपते आपल्या भावाला

निभावते कर्तव्य आईचे ।

Sanjay R.