Sunday, November 15, 2020

" दिवाळी बळीराजाची "

सगळेच म्हणतात मला
आहेस तू बळीराजा ।
भोगतो मात्र दुनियेची
दुःख हीच माझी सजा ।

फाटक तुटकच नशिबात
राहतो नेहमी अंधारात ।
अख्ख आयुष्य गेलं बघा
निरंतर असतो कष्टात ।

आडोशाला भिंती चार
वर फाटक तुटक छप्पर ।
शिक्षण पाणी पण शून्य
पोरही निघाले सारे टिप्पर ।

आशा मात्र सुटत नाही
उपसतो कष्टाचा डोंगर ।
एकच पाऊस देतो धोका
फिरते मेहनतीवर नांगर ।

लुटारू तर सांगू किती
खिसा भरतो व्यापारी ।
कर्ज काढूनच जगतो मी
झकास चालते सावकारी ।

राजकारण्यांच काय सांगू
देऊन जातात आश्वासन ।
शेतकऱ्यांचा नाही कोणी
काय करते सरकार पन ।

रडत फडत जातो दिवस
कुठला आला दिवाळ सण ।
नशीबाचाच फेरा आहे
हेच आमचे जीवन मरण ।

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल -8380074730


Friday, November 13, 2020

" एक किरण उजेडाचे "




दिवस येता दिवाळीचे
लोट वाहती आनंदाचे ।
हेच ते क्षण असतात
सुख आणि समृद्धीचे ।

एकच किरण उजेडाचे
साम्राज्य सरते अंधाराचे ।
प्रज्वलित होता दीप हजारो
स्वातंत्र्य हरते कळोखाचे ।

उगम होतो उत्साहाचा
विसर पडते दुःखाचे ।
जगून घेतो माणूस असे
हेच क्षण ते जीवनाचे ।
Sanjay R.

Thursday, November 12, 2020

" क्षण कुठला कसा "

क्षण कुठला कसा
नाही कुणास ठाव ।
जगतो प्रत्येक क्षण
मनात मात्र हाव ।

चाले आयुष्यभरच मग
नुसती धावाधाव ।
पैसा पैसा करत जगतो
कशाला हवे मोठे नाव ।

निघून जाते वेळ कशी
मग उरते काय राव ।
विचार थोडा करुनिया
वेळ सत्कारणी तू लाव ।

लाभेल तुज थोडी शांती
करू नकोस रे घाव ।
ऐश्वर्याचा होशील धनी
कळेल तुलाच प्रभाव ।
Sanjay R.


Wednesday, November 11, 2020

" वेळच कुठे गप्पांना "

वेळच कुठे आता गप्पांना 
सगळेच झालेत बिझी ।
नातेही थोडे रुंद झालेत
सम्पर्क होत नाहीत ईझी ।

वेळ असूनही माणूस
होतो थोडासा लेझी ।
आपलीच कामं इतकी
होताच येत नाही क्रेझी ।

दिवस रात्र विचार एकच
मारायची आयुष्यावर बाजी ।
नकळतच सरतात दिवस 
का जिद्दच होती ती माझी ।
Sanjay R.

Tuesday, November 10, 2020

" माहेरची दिवाळी "

मन गाभारा प्रसन्न
एक दिवाळीचा सण ।
आनंद फुलतो मनात
आला जवळ तो क्षण ।

लेक निघाली माहेरा
वाट पाही कोण कोण ।
आई बाप भाऊ बहीण
उभे दारात सारे जण ।

ओढ लागली घराची
आठवले घराचे आंगण ।
तुळसही बघते वाट कशी
नाही विसरली घर लांघन ।

आणली भावाने साडी
करेल लाडीगोडी बहीण ।
लाडू प्रेमाचा देईल आई
बाप डोळे भरून पहिण ।

सण दिवाळी आनंदाचा
जेव्हा येईल परत फिरून ।
माया विसरेल कशी लेक
येतील डोळे तिचे भरून ।
Sanjay R.