रोज चाले धावाधाव
यश कधी आपयश ।
न खचता चाले पुढे
ठेऊन मनाला खुश ।
मनी आशेचा किरण
दिसे समोरच प्रकाश ।
सर्वच सामावले इथे
वरती खुले आकाश ।
पुढे पुढे चालत राहा
करुन दुःखाचा विनाश ।
सुख दुःख येती जाती
होऊ नको रे निराश ।
Sanjay R.
घरा विना कुठली जागा
आवडती या भूतलावर ।
जाईल माणूस कुठेही
लक्ष फक्त त्याचे घरावर ।
राजे रजवाडे असो किती
आवडते तर घरच असते ।
चार दिवस घेतो फिरून
नंतर मात्र घरच दिसते ।
हवे नको ते सारे जुळते
पैश्या शिवाय काय मिळते ।
घर परिवार असतो जिथे
प्रेम मात्र तिथेच मिळते ।
Sanjay R.
मातीला देतो आकार
घडवितो घडा कुंभार ।
काय कुणावर उपकार
कोण मानतो आभार ।
चक्रासम फिरे विचार
होई घडा तिथे साकार ।
नाही कोणी लाचार
नाही कशाचा प्रचार ।
जीवन आहे निराकार
जगतो घेऊन सदाचार ।
स्वप्न आहे एक प्रकार
शोधतो त्यातच आधार ।
पाणी तृप्त करी क्षुधा
घड्याचा हा परोपकार ।
Sanjay R.