Sunday, August 16, 2020

" रिमझिम पाऊस "

" रिमझिम पाऊस "

झडच लावली या पावसाने
झाला सगळीकडे चिखल ।
वर आभाळ गच्च भरलेले
त्यात नाही सूर्याची दखल ।
साचले पाणी जागोजागी
नाही जिथे जागा सखल ।
रस्ते झालेत ताल तलाव
गड्डे त्यात किती खोल ।

Sanjay R.


Friday, August 14, 2020

" कर ना वो भजे "

" कर ना वो भजे "

झमझम झमझम
पाऊस पडून रायला
कर ना वो भजे
गया सुकून रायला ।

एकच हाये गिलास
जमवतो त्याले पयला ।
बाबुराव येतोच मने
होईन मंग नैला दैला ।

लय भिजलो पावसात
शर्ट न्हाई वायला ।
प्यांट त गच्च हाये वला
सुकून थोडा रायला ।

बसल्या जागी इचार यते
पिकन का न्हाई च्यायला ।
कर्जाचा डोंगर डोईवर
फिटन कसा मायला ।

जाऊ दे ना आता
इचार कहाले कराचा ।
चार चार भजे खाऊन
शिन सारा घालवाचा ।

Sanjay R.


Thursday, August 13, 2020

" हवा विरंगुळा "

धकाधकीच्या या जीवनात
हवा विरंगुळा काही क्षणाचा ।
येईल मन विसवून थोडे
आनंद किती या जीवनाचा ।

चाले सदा धावपळ किती
प्रश्न मोठा या पोटाचा ।
रक्ताचे होते पाणी आणि
पालथा डोंगर कष्टाचा ।

मैत्री नाते बंध किती हे

धागा कसा या जीवनाचा ।
अंत हे तर पूर्णच सत्य
विचार नकोच दुःखाचा ।
Sanjay R.


Wednesday, August 12, 2020

" मन अधीर झाले "

मन अधीर झाले
कशा कशात गेले ।
आकाश इतके विचार
फिरून नभात आले ।

गती किती या विचारांची
नाही विसावा मनाला ।
वाटे कधी मनात
आता सांगू मी कुणाला ।

भिरभिर पाहे डोळे
कान वेध तो घेती ।
मन भरले जरी तुडुंब
जागा अंतरात रीती ।
Sanjay R.

Friday, August 7, 2020

" नशीब फिराले वेळ नाही लागत "

बाबू घे ना हातात ईळा
पर लटकवू नको गळा ।

टाक ना कापून तन
पिकन जास्त मन दोन मन ।

येईन पैसा हातात त
लागण तुह्याचं कामात ।

पैशानच होते बापा सारं
दुःख गरीबच नाही बरं ।

लेकरायले नाही शाळा
चालते निस्ता खेळा ।

पडलं कोणी बिमार पोट्ट
औषध कुठी न डॉक्टर कुठी ।

मेहनतीवर तुयाच बापू
वाजते राजकारणात भोपु ।

नशीबच तुह गा फुटक
आयुष्यही झालं तुटक ।

कधी निसर्गाचा घात
धुते व्यापारी बी हात ।

पर हारू नको असा
दिवस तुह्या बी येईन तसा ।

सोडू नको गा मेहनत
नशीब फिराले येळ नाही लागत ।
Sanjay R.