Wednesday, August 5, 2020

" आहे मन मधुर "

मनच आहे ते
असंख्य विचारांचं घर ।
सोडलं मोकळं
पळतं दूर दूर ।
 ठेवलं बंधून तर
होतं किती आतुर ।
गोधळत जेव्हा ते
लागत नाही सूर ।
सोडले धैर्य तर
होते चुर चुर ।
ठेवता अंकुश थोडा
येई आनंदाला पूर ।
जगायचे आनंदात
आहे मन मधुर ।
Sanjay R.

Monday, August 3, 2020

" नाते "

नात्यांचा तर झाला अंत
आहे ज्याला तो निवांत

नसेल त्याच्या मनात खंत
भिर भिर पाही बसून शांत 

वाटे जणू तो मोठा महंत
नाते तुटले मनात आकांत
Sanjay R.

Friday, July 31, 2020

" भ्रमण सूर्याचे "

सरते जिथे रात्र जेव्हा
आणि होते प्रभात ।
सूर्याच्या साक्षीने होते
दिवसाची सुरुवात ।

पूर्वे पासून पश्चिमेला
चाले सूर्याचे भ्रमण ।
होताच सायंकाळ
होई अंधाराचे आक्रमण ।

अस्त होताच सूर्याचा
येई साम्राज्य अंधाराचे ।
व्यापून जाई आकाश सारे
विश्व चंद्र आणि ताऱ्यांचे ।

कुठे लखलख कुठे चमचम
रातकिड्यांचे चाले आवाज ।
मधेच दिसतो दूर काजवा
सकाळ होता सरतो साज ।
Sanjay R.



Thursday, July 30, 2020

" मलाही परत हसायचं "

" आहे मला हसायचं "

अहो सांगा ना कोणी
शाळेत कधी जायचं ।

कंटाळा आला आता
किती घरात बसायचं ।
 
विसरलोच वाटते मी
दंगा मस्ती करायचं ।

भेट नाही गाठ नाही
कुठे मित्रांना शोधायचं ।

घरातल्या घरात आता
एकटच कसं खेळायचं ।

प्रश्न मनात झालेत जमा
कधी गुरुजींना विचारायचं ।

जा बाबा कोरोना तू
आहे मला हसायचं ।
 संजय रोंघे

🥱😃🥱😃🥱😃🥱

Wednesday, July 29, 2020

" लावणी जीव तुझ्यात रंगला "

करून मी नट्टा पट्टा
झाली हो तय्यार....
घ्या बघून डोळे भरून
करू नका अंधार....

मज वाटते हो भीती
सांगू कशी किती....
राया जाऊ नका दूर
घ्याना हात माझा हाती....

गेले किती मी थकून
वाट तुमची हो बघून....
या जरा रंगात आज
जाइल ताण माझा निघून...

घ्या जवळ मला आज
काढते मी साज...
करा बंद तुम्ही डोळे
मज वाटते हो लाज.....

देते सारे मी तुम्हास
हळू घ्या ना जरा श्वास...
रात्र ही आजची
आहे किती खास...

मिठीत तुमच्या राया
मिटवा माझी क्षुधा....
प्रीत तुमची माझी
कृष्णाची जशी राधा....
Sanjay R.