Saturday, July 4, 2020

" प्रियकर चहाचे "

उठताच सकाळी
हवा एक चहा....
कामाची सुरुवात
नंतरच पहा...

पाहुणा मेहुणा
असो कोणीही....
आदरातिथ्य करायचे
देऊन चहा....

चहा विना टाइम पास
काम कठीण महा....
असेल वेळ काढायचा
तर सोबती होतो चहा.....

भूक असो नसो
केव्हाही चालतो चहा....
नाही मिळाला चहा तर
लागते रुख रुख पहा.....

राग असो प्रेम असो
चमकतात तारे.....
चहासाठी कधी कधी
दुखते डोके सारे....

चहा चहा म्हणताच
तलफ येते भारी......
चहा पिऊन बघा
फिरून येते हुशारी....

सवय चहाची
नसेल हो बरी.....
प्रियकर चहाचे
आहेत खूप तरी.....
Sanjay R.


Friday, July 3, 2020

" जीवन ही लघुकथा "

जगणे माणसाचे
आहे यात व्यथा ।
इति पासून अंतावरी
होते मोठी गाथा ।

दिवस रोजचा असे
एक लघु कथा ।
झुकवून चरणी
उंचावतो माथा ।

पाळीतो जीव प्रत्येक
पोटासाठी प्रथा ।
शमेना ही भूक कधी
अतृप्त सारेच नाथा ।

भ्रमंती आयुष्याची
झिजवतो लाथा ।
डोळ्यात आसवंच
उरलेत आता ।
Sanjay R.




" गेले ते दिवस "

दिवसा मागून दिवस गेले
सांग जीवनात काय केले
आयुष्याचे अर्धे वर्ष
पाठ जीवनाचे शिकणे झाले ।
उरले सुरले सारेच वर्ष 
पैसा पैसा करण्यात गेले ।
हसणे कधी रडणे कधी
यातच सारे रडगाणे झाले ।
पाहता पाहता अंत आला
जन्मभराचे जळणेच झाले ।
Sanjay R.

Thursday, July 2, 2020

"सागर किनारा "

काठाला स्पर्श करून 
जातात दूर लाटा ।
सरतात जिथे बघा
पावलांच्या वाटा ।

अथांग पसरलेला
वाटे निजलेला सागर ।
किनाऱ्यावर चाले 
लाटांचा जागर ।
Sanjay R.





Wednesday, July 1, 2020

" प्रेमाचा ध्यास "

जीवन हे सारे
आहे फक्त श्वास ।
जगण्यास हवा
प्रेमाचा आभास ।

येती आणि जाती
दुःखाचे निश्वास । 
सदा मनी चाले
सुखाचाच ध्यास ।

करू मी किती
मनात प्रयास ।
अंतरात माझ्या
प्रीतीचा वास ।

सत्य हे जीवनाचे
हवा विश्वास ।
प्रेमविन नाही
काही इथे खास ।

विराण वाटेवर
कठीण प्रवास ।
असता होई सुकर 
प्रेमाचा सहवास ।
Sanjay R.