Friday, May 22, 2020

" हृदय मी दिले तुजला "

अंतरात आहेस माझ्या तू
सदा असते विचारात तू ।

तुजविण न सुचे मजला
आहेस माझ्या प्रेमात तू ।

दिवस असो वा रात्र असो
स्वप्नात माझ्या असतेस तू ।

हृदय मी दिले तुजला
झालीस माझे जीवन तू ।

प्रवास आता या जीवनाचा
करू सोबतीने मी आणि तू ।

ऊन असो वा असो पाऊस
अंगणात मनाच्या तूच तू ।

आनंदाची बरसात होता
भिजलेल्या धरेचा गन्ध तू ।
Sanjay R.

Thursday, May 21, 2020

" जीव गेला कावून "

तू थांब घरात
मी येतो जाऊन ।
कुठी हाये कोरोना
येतो मी पाहून ।

थकून गेलो आता
घरात मी ऱ्हावून ।
दूर ऱ्हाय दूर ऱ्हाय 
पालुपद गाऊन ।

हिंडन न्हाई फिरणं न्हाई
गेलो आता कंटाऊन ।
जवा तवा थेच थे
भौ जीव गेला कावून ।

धा बारा दिस आता
हाये म्हनते अजून ।
जुन्यावानीच होऊ दे
निंगीन सजून धजून ।
Sanjay R.

Wednesday, May 20, 2020

" एक कप चहा "

फक्त एकच कप चहा
पण देते स्फूर्ती पहा ।
नाही मिळाला तर
दुखते डोकं महा ।

येते जेव्हा तलफ
होतो अस्वस्थ किती ।
एक घुट पिल्यावर
पळते सारीच भीती ।

कडक स्पेशल दुधाचा
पितांना चहा गरमच हवा ।
थंड मात्र झाला तर
नाही कामाची ती दवा ।

पाहुणा असो वा मेहुणा
स्वागत चहानेच करायचे ।
एक कप चहा पाजून
कुठलेही काम काढायचे ।

ओळख पाळख मैत्री नाते
चहाच करतात दृढ ।
आहे अमृत तुल्य हे पेय
असतात उपाय याचे गूढ ।
Sanjay R.




Tuesday, May 19, 2020

" विजय हा पक्का आहे "

निघालेत सारे लढाया
विजय हा पक्का आहे
थोडासा तर धीर धरा
जगायचे हो परत आहे

बेफाम पणा विसरा आता
नियमांचे तुम्ही पालन करा ।
जीवन होणार कठीण खूप
शिस्तीत तुम्ही वागा जरा ।

विजय तुमचा होणार नक्की
करा मेहनतीने जागा पक्की ।

आनंदाने जगा हो सारे
होऊ नका कुणीच दुःखी ।
Sanjay R.


Monday, May 18, 2020

" विचारच सरले "

सकाळी उठताच
मूड झाला बेकार ।
आता रोजचाच
झाला हा प्रकार ।

दिवस काय नि 
रात्र  काय ।
विचार डोक्यात
एकच हाय ।

उठणार कधी
ही संचारबंदी ।
विचारांची तर
झाली बुंदी ।

दिवसा पण आता
येतात स्वप्न ।
गोंधळ गर्दी त्यात
स्वतःला जपणं ।

कठीणच वाटतं 
स्वछंदी जगणं ।
कुणास ठाऊक
येईल कधी मरणं ।

विचारच सरले
फक्त डोके उरले ।
दिवस जाताहेत
नि डोळे भरले ।
Sanjay R.