Tuesday, May 19, 2020

" विजय हा पक्का आहे "

निघालेत सारे लढाया
विजय हा पक्का आहे
थोडासा तर धीर धरा
जगायचे हो परत आहे

बेफाम पणा विसरा आता
नियमांचे तुम्ही पालन करा ।
जीवन होणार कठीण खूप
शिस्तीत तुम्ही वागा जरा ।

विजय तुमचा होणार नक्की
करा मेहनतीने जागा पक्की ।

आनंदाने जगा हो सारे
होऊ नका कुणीच दुःखी ।
Sanjay R.


Monday, May 18, 2020

" विचारच सरले "

सकाळी उठताच
मूड झाला बेकार ।
आता रोजचाच
झाला हा प्रकार ।

दिवस काय नि 
रात्र  काय ।
विचार डोक्यात
एकच हाय ।

उठणार कधी
ही संचारबंदी ।
विचारांची तर
झाली बुंदी ।

दिवसा पण आता
येतात स्वप्न ।
गोंधळ गर्दी त्यात
स्वतःला जपणं ।

कठीणच वाटतं 
स्वछंदी जगणं ।
कुणास ठाऊक
येईल कधी मरणं ।

विचारच सरले
फक्त डोके उरले ।
दिवस जाताहेत
नि डोळे भरले ।
Sanjay R.

Sunday, May 17, 2020

" मन झाले धुंद "

पहिल्या पावसाचा गंध
मन झाले माझे बेधुंद ।
चल जाऊ या पावसात
लुटू भिजण्याचा आनंद ।
Sanjay R.


Saturday, May 16, 2020

" तुटले अंधाराचे जाळे "

झाले आकाश निळे
तुटले अंधाराचे जाळे ।

त्यात ढग काही काळे
वाऱ्यासंगे पुढे पळे ।

सूर्य उगवला तो दूर
लाल त्याचे डोळे ।

निघे भाजून ही धरा
आटले पाण्याचे तळे ।

पाणी ढगात थेंब चार

दुरून किती ते छळे ।

येता पावसच्या सरी
वाहे भरून खळे ।
Sanjay R.


Friday, May 15, 2020

" उंबरठा "

उंबरठा घराचा म्हणजे
मर्यादांची एक रेषा 
रेषेच्या आत जीवनाचा श्वास
पडलात बाहेर तर
होईल आपलाच विनाश ।
आत राहूनच मग
ओळखायचे सारे आभास
तोल थोडा जरी गेला तर
मिळेल समाजाचा परिहास ।
उंबरठ्याचे महत्व आहे महान
फक्त मर्यादांचे थोडे ठेवायचे भान ।
Sanjay R.