Sunday, May 17, 2020

" मन झाले धुंद "

पहिल्या पावसाचा गंध
मन झाले माझे बेधुंद ।
चल जाऊ या पावसात
लुटू भिजण्याचा आनंद ।
Sanjay R.


Saturday, May 16, 2020

" तुटले अंधाराचे जाळे "

झाले आकाश निळे
तुटले अंधाराचे जाळे ।

त्यात ढग काही काळे
वाऱ्यासंगे पुढे पळे ।

सूर्य उगवला तो दूर
लाल त्याचे डोळे ।

निघे भाजून ही धरा
आटले पाण्याचे तळे ।

पाणी ढगात थेंब चार

दुरून किती ते छळे ।

येता पावसच्या सरी
वाहे भरून खळे ।
Sanjay R.


Friday, May 15, 2020

" उंबरठा "

उंबरठा घराचा म्हणजे
मर्यादांची एक रेषा 
रेषेच्या आत जीवनाचा श्वास
पडलात बाहेर तर
होईल आपलाच विनाश ।
आत राहूनच मग
ओळखायचे सारे आभास
तोल थोडा जरी गेला तर
मिळेल समाजाचा परिहास ।
उंबरठ्याचे महत्व आहे महान
फक्त मर्यादांचे थोडे ठेवायचे भान ।
Sanjay R.


Thursday, May 14, 2020

" व्हायरस "

डिसेंम्बर महिना आला आणि सगळ्यांना येणाऱ्या 2020 वर्षाचे वेध लागले. 31 डिसेम्बरच्या रात्री काय करायचे याचे प्लॅनिंग सुरू झालेत. 2019 वर्ष पूर्णच कामाच्या व्यापात निघून गेले होते .
आता थोडा आराम मिळणार होता. आणि नव वर्ष येणार म्हटल्यावर आनंद उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. पार्टीचे प्लॅनिंग सुरू झाले होते. कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. मेनू आणि व्हेनू ठरवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि इतर निमंत्रितांची सुद्धा यादी करण्यात आली होती. स्टेज, आणि कलाकार ठरविण्यात आले होते. तसी सगळीच तयारी पूर्णत्वाला आली होती. आता फक्त दिवसांची तेवढी वाट बघायची होती .

डॉक्टर संदीप आणि असिस्टंट नितीन आज काम सम्पवून आरामात बसले होते. नितिन ने नवीन काही रिसर्च रिपोर्ट्स पब्लिश झालेत का म्हणून सर्च इंजिन सुरू केले. एक एक रिपोर्ट डिस्प्ले व्हायला लागले. सगळेच रिपोर्ट जवळ पास जुन्या सारखेच होते. नवीन अस काहीच नव्हते.  सो नितीन ने एक लांब श्वास टाकला आणि तितक्यात मॉनिटर वर रेड अलर्ट डिस्प्ले झाला . साहजिकच नीतीचा लांब श्वास तिथे अडकला आणि तो अलर्ट कशाचा म्हणून त्याने त्यावर क्लीक केले.
रिपोर्ट वाचून त्याला तर एकदम घामच फुटला. चीनच्या ल्याब मधून एक व्हायरस लिक झाला होता आणि. त्या पासून ल्याब मधील लोकांना संक्रमन झाले होते. न्युज कॉन्फिडेनशीअल होती.
त्याने डॉक्टर संदीपला जवळ बोलवले आणि रिपोर्ट वाचायला दिला. डाक्टर संदीप पण अस्वस्थ झाले.
आता काय होणार या चिंतेने दोघेही अस्वस्थ झाले होते.  कुणालाच काही सुचेना . डॉक्टर संदीपनी रिपोर्ट आपल्या हेड ऑफिसला फॉरवर्ड केला. आणि विषय हे गांभीर्य शॉर्टमध्ये लिहून. धोक्याचा संकेत दिला.

चीन ने आपला डाव साधला होता. सम्पूर्ण जगाला विळख्यात घेण्यास चीन सरसावला होता. अमेरिकेने अजून आपली भूमिका स्पस्ट केली नव्हती. सगळेच या धक्क्याने विचलित झाले होते. आपल्या नागरिकांना कसे वाचवायचे या विवंचनेत सगळेच लागले होते. नागरिकांनाही या व्हायरस बद्दल कुठलीच पूर्व कल्पना नसल्याने सगळेच त्याला लाईटली घेत होते, पण देशांच्या प्रमुखांना याची भीषणता लक्षात आली होती . जगातील सगळे डॉक्टर्स, मेडिसिन क्षेत्रातील संशोधक, याना या व्हायरसचा अंदाज आला होता. पण यावर कुठलाच उपचार अजून पर्यंत उपलब्ध नव्हता . त्यामुळे जगावर फार मोठा आघात होणार होता.

डॉक्टर संदीपनी व्हायरस वर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आणि आपले कार्य सुरू केले.
इंटरनेट वर व्हायरस संबंधात माहिती काढली.
माणसाला इन्फेक्शन झाल्यावर काय सिम्पटोम्स येतात त्याची माहिती काढली. माणसाचा ईमुनिटी पावर कसा कमी होतो याची माहिती मिळवली.
सम्पूर्ण माहिती चे तक्ते तयार केलेत.
अशाच प्रकारच्या अगोदर आलेल्या आजरावर के उपाय होते, त्यांची लक्षण आणि उपचार यांची माहिती काढली.
या व्हायरस च्या पेशन्ट ची लक्षणे सर्दी खोकला असलेल्या पेशन्ट ची लक्षणे जवळपास सारखीच होती , पण होणारे परिणाम मात्र खूपच भयंकर होते. त्यातल्या त्यात बीपी शुगर दमा या आजारच्या पेशन्ट वर या व्हायरस चा प्रभाव फार लवकर होत होता आणि केस निमोनिया पर्यंत पोचत होती. उपायची कुठेच लिंक लागत नव्हती . ईमुनिटी वढवणार्या औषधांचा उपयोग काही केसेस मध्ये उपयोगी ठरते होता तर काही केसेस मध्ये कुठलाच फरक होत नव्हता.
या आजाराला समर्थपणे पेलू शकणारा कुठलाच इलाज अजूनतरी कुणालाच सापडत नव्हता.
सम्पूर्ण जगात उपचारासाठी संशोधन सुरू आहे.
काही देशांनी यात यश मिळवल्याचा दावा सुद्धा केला. असेच प्रयत्न भारतात सुद्धा सुरू आहेत.
आयुर्वेद उपचारांनी ईमुनिटी वाढवायचे बरेच उपचार प्रचलित आहेत. या उपचारांनी भारतीय प्रजा आपली ईमुनिटी वाढवून व्हायरस पडून आपला बचाव करू शकतात. अति इन्फेक्टेड पेशन्ट प्लाजमा थेरपी द्वारा ही बरेच पेशन्ट दुरुस्त झालेत. तसेच हिवतापवर चालणारे औषध क्लोरोक्वीन ही बऱ्याच पेशन्ट ना उपयोगी ठरले.  अजूनही जगभरात संशोधन सुरूच आहेत.
डॉक्टर संदीप आणि त्यांची टीम त्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आणि त्यांना खात्री आहे की ते नक्कीच यशस्वी होतील.
येणारा काळ नक्कीच हे सिद्ध करेल आणि मानवाचा विजय होईल.
Sanjay R.


" कोरोना युद्ध वीर "

आहे सुरू आता लढाई
करायची कोरोनावर चढाई ।

शिस्तीसाठी पोलीस रस्त्यावर
रुग्णसेवा डॉक्टर आणि नर्सेसवर ।

घरोघरी जाताहेत आशा वर्कर
जवाबदारी मोठी सरकार वर ।

अधिकारी सारे तैनात युद्धावर
भार मोठा आता जनतेवर ।

गरिबांचे तर हाल बेकार
नाही पोटाला कुठलाच आधार ।

पलायन करताहेत मजूर सारे
जिवाच्या भीतीचे वाहताहेत वारे ।
Sanjay R.