Sunday, May 10, 2020

" अशी ही आई "

असेल मूल जरी कुठे
प्राण आई चा मुलात ।

असते प्रतीक्षा डोळ्यात
विचार त्याचाच अंतरात ।

सोसते दुःख सारे स्वतः
हवे मूल सदा सुखात ।

नसते काळजी जीवाची
प्राण वसे आईचा मुलात ।

नाते आईचे हे अनोखे
नसे दुसरे असे या जगात ।
Sanjay R.

Saturday, May 9, 2020

" गोंडस हास्य "

येईल कधी परत
मुखावरचे ते हास्य ।
झाले बंदिस्त घरात
सुखाचे ते रहस्य ।

कंटाळले बाळ गोपाळ
झाला कसा हा खेळ ।
मित्र नाही संगतीला
कसा घालवायचा वेळ ।

नाही शाळा नाही परीक्षा
वाटे भय किती मनाला ।
जो तो दिसे चिंतेत इथे
दुःख माझे सांगू कुणाला ।
Sanjay R.

Friday, May 8, 2020

" झाला संसार फाटका "

निघाला गावाकडे बाप
 खांद्यावर पोर लागली धाप ।

माय चाले लगबग लगबग
उरात तिच्या जगण्याची धग ।

माय बाप पोर निघाले पाई 
भुकेलेले पोट खिशात पैसा न्हाई ।

दिवस कठीण हे आले आता 
नाही काम धाम , नाही कुणी दाता ।

का भोग असे हे आले नशिबी
आला कोरोना होती आधीच गरिबी ।

नाही यातून कुणाची सुटका
तुटका संसार  होईल आता फाटका ।
Sanjay R.


Thursday, May 7, 2020

" माझी कमाई "

निघालो जेव्हा मी
करण्या कमाई ।
लुटारूंची फौज इथे

झाली गामाई ।

कष्टाचा उपसायचा डॉगर
मिळते तेव्हा पै पै ।
नाही लागत वेळ जास्त
होतात खर्च पैसे लै ।

पैशाचे महत्व कळते तेव्हा
असतो जेव्हा तो घामाचा ।
पैशाविना तर व्यर्थ सारे
नाही इथे कुणीच कामाचा ।
Sanjay R.


Wednesday, May 6, 2020

" चला जाऊ आता चंद्रावर "

चला जाऊ आता चंद्रावर  ।

राहू तिथेच ,
नसतील निर्बंध जगण्यावर ।

अन्न पाणी वारा
 मिळेल का सारं चंद्रावर ।

ऑनलाइन मागवू
बघू या थोडं अम्याझोन वर ।

गर्दी नसेल माणसं नसेल
औषधही मिळेल तिथे कोरोनावर ।

जीवनाची खात्री असेल 
भरोसाच नाही आता या पृथ्वीवर ।
Sanjay R.