माझ्या कविता - By Sanjay Ronghe
गरीबाच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य दोन हात करत लढते घरात नारी ।
मुखकमलावर आनंद
बघाया प्रयत्न तिचे थांबवते दुःख सारे दूर अंगणाच्या दारी ।
असेल नसेल जरी घरात काही ही संसार नेटका करण्या चाले प्रयत्न भारी ।
घरात मग नांदे सुख आणि समाधान मानून आभार देवाचे घडवते पंढरीची वारी । Sanjay R.