Thursday, April 9, 2020

" रंग आनंदाचा कुठे "

आले दुःखाचे वादळ इथे
डोक्यावर चिंतेचा बोझा 
चिंता आपलीच घ्यायची
नाही कोणी तुझा माझा ।

नाही हाताला उरले काम
डोक्याला विचारांचा भार ।
बघत असतो दिवसभर
उघडून हळूच थोडेसे दार ।

होईल काय कसे बघा उद्या 
होते डोके आता जड ।
पैसा खिशातला सरला
सुटेल का सांगा पोटाची नड ।
Sanjay R.

Wednesday, April 8, 2020

" ब्रेक अप जीवनाचा "

रोजच वाढत आहे 
आता टेन्शन ।
वाटतं जीवनानेच
घेतली आता पेन्शन ।

मनात येतं वारंवार
शरीर झालं रिटायर्ड ।
झोपायचे सांगा किती
पाठ झाली टायर्ड ।

मधेच वाटतं काही खावं
पोटाला सुटली हाव ।
काम धाम झाले बंद
करायची कशी धावाधाव ।

वाढेल म्हणतात परत 
लॉक डाऊन  आता ।
राहायचे घरातच एकटे
करत मनाशीच बाता ।

जीवनाचा हा ब्रेक अप
जीवनाशीच होतोय ।
मनातले सारे विचार
मनातच आता ठेवतोय ।
Sanjay R.


" लढते घरात नारी "

गरीबाच्या घरी
अठरा विश्व दारिद्र्य
दोन हात करत
लढते घरात नारी ।

मुखकमलावर आनंद

बघाया प्रयत्न तिचे
थांबवते दुःख सारे
दूर अंगणाच्या दारी ।

असेल नसेल जरी
घरात काही ही
संसार नेटका करण्या
चाले प्रयत्न भारी ।

घरात मग नांदे
सुख आणि समाधान
मानून आभार देवाचे
घडवते पंढरीची वारी ।
Sanjay R.


Tuesday, April 7, 2020

" योग विज्ञान "

घालवायचा जर रोग
तर रोज करा योग ।

करा थोडा व्यायाम
सोबतीला प्राणायाम ।

करा काही आसन
वाढवा थोडे श्वसन ।

योग आहे विज्ञान ।
करा सगळ्यासी सज्ञान ।

मिळवा सुख आनंद
निरोगाचा हाच बंध ।
Sanjay R.


Monday, April 6, 2020

" स्वप्नच आहे आशा "

स्वप्न एक आशा
बघतो एक दिशा
अंतरात उठे नशा
कर्तव्याची भाषा
मावळेल का स्वप्न
आळसाची ही दशा
उठा आणि जागे व्हा

स्वप्नच आहे आशा

Sanjay R.