Tuesday, April 7, 2020

" योग विज्ञान "

घालवायचा जर रोग
तर रोज करा योग ।

करा थोडा व्यायाम
सोबतीला प्राणायाम ।

करा काही आसन
वाढवा थोडे श्वसन ।

योग आहे विज्ञान ।
करा सगळ्यासी सज्ञान ।

मिळवा सुख आनंद
निरोगाचा हाच बंध ।
Sanjay R.


Monday, April 6, 2020

" स्वप्नच आहे आशा "

स्वप्न एक आशा
बघतो एक दिशा
अंतरात उठे नशा
कर्तव्याची भाषा
मावळेल का स्वप्न
आळसाची ही दशा
उठा आणि जागे व्हा

स्वप्नच आहे आशा

Sanjay R.


Sunday, April 5, 2020

" सारेच व्यर्थ "

असेल जिथे स्वार्थ
नाही कशालाच अर्थ  ।

जीवनात हवा परमार्थ
अन्यथा सारेच व्यर्थ ।

मोह माया आणि क्रोध 
लक्षणे ही सारी धूर्त ।

बाळगा थोडा सय्यम
जीवन हेच प्रसाद तीर्थ ।
Sanjay R.

Saturday, April 4, 2020

" क्षण हातातून निसटत आहेत "

जीवन हे संकटांचा सागर
अहोरात्र चाले कष्टाचा जागर ।

घ्यायचा साऱ्यांनाच इथे आनंद
पण हाती आहे  फुटकी घागर ।

अशांत हे बघा जीवन किती
शोधतो शांती नगर नगर ।

जग हे इथले विशाल किती
चहूकडे दुःखाचा पसरला सागर ।

घेतो भरून ओंजळीत आता
सुख अंतरात लागे त्यावर नजर ।

क्षण हातातून निसटत आहेत
जीवना थांब थोडा मी आहे हजर ।
Sanjay R.

Friday, April 3, 2020

" अनमोल वेळ "

जीवन हा नाही खेळ
अनमोल असे यात वेळ 
काढून सवड बसवा मेळ 
लाभतो मग आनंद निर्भेळ 
Sanjay R.