Monday, March 30, 2020

" जीव जगण्यावर जडला "

जीव जगण्यावर जडला
वाटते भीती मरणाची ।
पेटली आग या अंतरात
लागली रास सरणाची ।
डोक्यात वादळ विचारांचे
मीमांसा करतो कारणांची ।
सुख दुःख भाग जीवनाचे
ओढ अजूनही जगण्याची ।
Sanjay R.


Sunday, March 29, 2020

" संसार सांभाळताना "

कष्ट किती तिचे
कळले मला आता ।
सारेच आहेत घरात
भीती पाई कुठे जाता ।

मांडतो मी पसारा सारा
जीव जातो उचलता उचलता ।
मीच ठेवतो उचलून मग
बदललो किती पाहता पाहता ।

खाणे पिणे उचल घाचल
काम तिचे समजले आता ।
घरी राहून कळले सारे
शोभतो आता मी पिता ।
Sanjay R.


Saturday, March 28, 2020

" माती "

जुळलेली सगळी नाती जिथे
ती माय माऊली माती इथे ।

हसवते खुलवते करते संगोपन

देते आनंद फुलऊन हे जीवन ।


क्षणोक्षणी येते तीच धावून
शेवाटीही घेते स्वतःत सामावून ।
Sanjay R.


Friday, March 27, 2020

" लॉक डाऊन "

केले सरकारने जाहीर
लॉक डाऊन भारतभर ।
वाचवायचा आपला जीव
सुरक्षित आहे आपले घर ।

बाळगा थोडासा सय्यम
निघू नका कोणी रस्त्यावर ।
नियम थोडे पाळा हो
संकट मोठे हे या जगावर ।

येतील दिवस परत सोन्याचे
जगलो वाचलो आपण तर ।
सारेच आहे आपल्या हाती
मिळवू विजय या कोरोनावर ।
Sanjay R.

Thursday, March 26, 2020

" देवा तूच रे आता वाचव "

चीनने केली एक चुकी
झाली दुनिया रोगी ।

बसवले साऱ्यांना घरात
भीती मरणाची मनात ।

गेलेत हजारो लोक सोडून
पुढ्यात मरण आहे वाढून ।

जग झाले लॉक आऊट 
प्रत्येकाला होतोय डाऊट ।

जगण्यासाठी आहे धडपड
छातीत होते आता धडधड ।

देवा तूच रे आता वाचव 
कोरोनाला दूर तू घालावं ।
Sanjay R.