माझ्या कविता - By Sanjay Ronghe
परंपरेत बांधलेलो आम्ही चाकोरीत त्या जगायचे । नियम केलेत समाजाने त्यांनाही आपण पाळायचे ।
विचारांना कुठे कशाच्या मर्यादा नियमात म्हणून वागायचे । आचार विचार समाजनुरूप ठेऊन आपण राहायचे ।
परंपराही काही भोळ्या त्यांना आपण सोडायचे । चांगले ते घेऊन सारे दुःखाला दूर सारायचे । Sanjay R.