" माझे मन "
माझ्या कविता - By Sanjay Ronghe
Friday, March 13, 2020
" सजली आज मेहंदी "
हातावर तुझ्या बघ
सजली आज मेहंदी ।
स्वप्न होते साकार
नवजीवनाची धुंदी ।
मन घेते झेप आकाशी
वाटे जग सारे आनंदी ।
नकळे सहजीवन हे
स्वच्छंदी की आहे बंदी ।
Sanjay R.
Thursday, March 12, 2020
" नको परत तो आवाज "
संगीताच्या तालावर
घेऊन शब्द नवा साज ।
थरथरत्या ओठातून
लयीत निघाले आज ।
गेले भेदून काळजाला
नव्हता कुणाला अंदाज ।
पाणावले डोळे मग
लटकली वेशीला लाज ।
बंद कान बंद डोळे
नको परत तो आवाज ।
दूर श्रीमंत वाड्यातला
नको वाटतो तो रिवाज ।
Sanjay R.
Wednesday, March 11, 2020
" जीवन प्रकाशाचे किरण "
जीवन प्रकाशाचे किरण
जगण्याला त्याचेच कारण ।
ठरवायचे रोज नवे धोरण
बांधायचे सकाळी तोरण ।
पोटासाठी जातो शरण
कष्टाचे त्याला पारण ।
सारतो एक एक दिवस
अंताला शेवटी येते मरण ।
रचायचे मग शेवटाचे सरण
रूप नव्याचे होते धारण ।
रात्रंदिवस चाले प्रवास
चंद्र सूर्य सोबतीला आमरण ।
Sanjay R.
Tuesday, March 10, 2020
" पहिली भेट "
भेटतो मी तुला जेव्हा
वाटतं ही आहे आपली
अगदी पहिलीच भेट ।
हृदयात होतात कम्पन
मनाला आनंद आणि
नजर डोळ्यात तुझ्या थेट ।
Sanjay R.
Monday, March 9, 2020
" वाट पाहतो उत्तराची "
सांग तूच आता
किती वाट बघायची ।
प्रश्न होता माझा
वाट तुझ्या उत्तराची ।
प्रश्नांचे तर वादळ इथे
दूर त्याला सारण्याची ।
अंतरात आहे आस
नाव ही जीवनाची ।
बेचैन होते मन जेव्हा
तडफड होते आठवांची ।
सुने वाटे तुझ्या विना
बरसात होऊ दे पावसाची ।
Sanjay R.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)