Wednesday, February 26, 2020
" तू रे असाच शिकत राहा "
Tuesday, February 25, 2020
" पदर डोक्यावर "
तिचा पदर तिची आहे लाज
सांभाळते ती त्यात तिचा साज ।
जेव्हा लेकरू असे कडेवर
सुख देउ त्यासी तिचा पदर ।
ऊन पाऊस करे जेव्हा मारा
डोक्यावर पदर देई गार वारा ।
पाहून एकटी लोक करी इशारा
एकटा पदर सांभाळी सारी धुरा ।
मान सन्मान लाज आणि लज्जा
कवच सुरक्षेचे देण्या पदर सज्ज ।
स्त्री चा पदर आहे तिचे सर्वस्व
सारेच जाणती आहे त्याचे वर्चस्व ।
Sanjay R.
Saturday, February 22, 2020
" तू कर चुका "
Friday, February 21, 2020
" एक वेगळा अर्थ "
प्रेमाला एक ना
वेगळाच अर्थ
नाही त्यात स्वार्थ
नाही परमार्थ
बस आहे ती हाक
अंतरातली आर्त
काय प्रेमाचा
भावार्थ
लपले त्यात
शब्दार्थ
विचारांचा आहे
सर्वार्थ
कराया आकलन
मानावे तीर्थ
Sanjay R.

" पैसा सब कुछ "
येरे पैसा, जाऊ नको पैसा
पैसा पैसा करत जगायचे ।
पैश्या शिवाय काय दुसरे
आला पैसा की हसायचे ।
नको काम, नको कष्ट
मार्ग पैश्याचे हो शोधायचे ।
हात मळताच पैसा यावा
असेच काहीतरी करायचे ।
येणार नसेल पैसा सहज तर
अश्रू दोन मग गाळायचे ।
चोरी मारी लाच खोरी
करून पैसे मात्र मिळवायचे ।
पैश्याविना सुख कुठे हो
दुःखात कशाला पडायचे ।
पैसा तर आहे सब कुछ
कशाला गरिबीत मरायचे ।
Sanjay R.