येरे पैसा, जाऊ नको पैसा
पैसा पैसा करत जगायचे ।
पैश्या शिवाय काय दुसरे
आला पैसा की हसायचे ।
नको काम, नको कष्ट
मार्ग पैश्याचे हो शोधायचे ।
हात मळताच पैसा यावा
असेच काहीतरी करायचे ।
येणार नसेल पैसा सहज तर
अश्रू दोन मग गाळायचे ।
चोरी मारी लाच खोरी
करून पैसे मात्र मिळवायचे ।
पैश्याविना सुख कुठे हो
दुःखात कशाला पडायचे ।
पैसा तर आहे सब कुछ
कशाला गरिबीत मरायचे ।
Sanjay R.