Friday, February 21, 2020

" जगाची रितच निराळी "

दिवसभर चाले
नुसती पळा पळी ।
रात्री शांती नि
परत तेच सकाळी ।

कुणाकडे असे
रोजच दिवाळी ।
कुणाच्या भुकेला
नसे एक पोळी ।

उपसतो कुणी कष्ट
रक्त आपले जाळी ।
बघतो बसून कोणी
वाजवितो टाळी ।

गरीब कुणी श्रीमंत
लिहून त्याच्या भाळी ।
जगाची ना हो या
आहे रीतच निराळी ।
Sanjay R.

" स्वातंत्र्य तर हक्क आमचा "

स्वातंत्र्य आहे तुम्हाला
बोला काय वाट्टेल ते ।
बिघडतं कुठं काही
विचारही तुमचेच ते ।

शिव्या घाला आडवे पाडा
माळीसाठी काढा जोडा ।
संस्कृतीला फोडा झोडा
माणुसकीला असेच तोडा ।

मान सन्मान हवा कुणाला
व्हायचे श्वापद हो आम्हाला ।
स्वातंत्र्य तर हक्क आमचा
सांगा काय करायचे तुम्हाला ।
Sanjay R.

Monday, February 17, 2020

" जिता हु मै "

जिता हु मै एक सपना
जीसमे कोई है एक अपना ।
नही कुछ इसमे पराया
है इसे हमे दिलसे जपना ।
Sanjay R.

" जगतो एक स्वप्न "

प्रत्येकाच्या मनात
असते एक स्वप्न ।
गाव असो वा शहर
चाले स्वप्नात जगणं ।
पोटासाठी चाले कष्ट
कष्टामध्ये तो मग्न ।
पाठ टेकवताच रात्री
आठवतात सारे विघ्न ।
निघून त्यातून मग
बघतो बंद डोळ्यात स्वप्न ।
हवं तसं अनुभवतो मग
तेच त्याच खरं जगणं ।
Sanjay R.

" जय गजानन "

ठेऊन मनात भाव
स्मरण तुमचे करावे ।
पूर्ण होती कामना
सारेच गजानना ठावे ।
शेगावी जाऊन एकदा
दर्शन माऊलीचे घ्यावे ।
प्रसाद झुणका भाकर
घ्यावा तो मनोभावे
श्रद्धा भक्तीचा सागर
जीवन धन्य ते करावे ।
Sanjay R.