Friday, February 21, 2020

" पैसा सब कुछ "

येरे पैसा, जाऊ नको पैसा
पैसा पैसा करत जगायचे ।
पैश्या शिवाय काय दुसरे
आला पैसा की हसायचे ।

नको काम, नको कष्ट
मार्ग पैश्याचे हो शोधायचे
हात मळताच पैसा यावा
असेच काहीतरी करायचे ।

येणार नसेल पैसा सहज तर
अश्रू दोन मग गाळायचे ।
चोरी मारी लाच खोरी
करून पैसे मात्र मिळवायचे ।

पैश्याविना सुख कुठे हो
दुःखात कशाला पडायचे ।
पैसा तर आहे सब कुछ
कशाला गरिबीत मरायचे ।
Sanjay R.




" काश्मीर हमारा "

थंड हवा गार गार वारा
निसर्ग रम्य परिसर सारा ।

उंच हिमालय , त्याचा तोरा
खळखळ वाहे पाण्याच्या धारा ।

शून्याखाली हो तिथला पारा
वाटते गर्वाने काश्मीर हमारा ।

पांढरा शुभ्र बर्फ चमके
हिरवा देवदार घेई ठुमके ।

गोरे गोमटे लोकही तिथले
वाटे नंदनवन आहे हे कुठले ।

दूर उंचावर शंकराचार्य मंदिर
ठेऊन अस्तित्व बाकी मिटले ।
Sanjay R.

" लव्ह यु जिंदगी "

जन्माला आलो तर जगायचे
येईल अंत तेव्हा हो मरायचे ।

सांगा जीवनाचा या काय अर्थ
दिसतो का हो कुठे यात स्वार्थ ।

आहे खळखळून मला हसायचे
धाय मोकलून कधी तरी रडायचे ।

उंच त्या आकाशात उडायचे
धपकन खाली येऊन मग पडायचे ।

रोज तेच ते नको हो जगायचे
काहीतरी वेगळं करून बघायचे ।

कानात कुणाच्या गुणगुणायचे
लव्ह यु जिंदगी आहे सांगायचे ।
Sanjay R.

" कशाचे हो नाते "

कुणाचे कुणाशी
कशाचे हो नाते ।
कामा शिवाय हो
जवळ कोण येते ।

नको माय बाप
नको भाऊ बहीण ।
राजा राणी दोघच
माझं मीच पाहीन ।

कुणाची कुणाला
गरज कुठे उरली ।
छोटीशी फॅमिली
माया आता सरली ।
Sanjay R.

" जगाची रितच निराळी "

दिवसभर चाले
नुसती पळा पळी ।
रात्री शांती नि
परत तेच सकाळी ।

कुणाकडे असे
रोजच दिवाळी ।
कुणाच्या भुकेला
नसे एक पोळी ।

उपसतो कुणी कष्ट
रक्त आपले जाळी ।
बघतो बसून कोणी
वाजवितो टाळी ।

गरीब कुणी श्रीमंत
लिहून त्याच्या भाळी ।
जगाची ना हो या
आहे रीतच निराळी ।
Sanjay R.