Tuesday, January 14, 2020

" हळदी कुंकू "

आली संक्रांत
तीळ गूळ घ्या ।
नसेल बोलायचे तर
तीळ साखर द्या ।

शेंगा बोराचं
वाण मोठं भारी ।
स्त्रिया मिरवायला
जातात शेजारी ।

चिंगी आज खुश
होणार तिची लूट ।
वातावरणात गारवा
पप्पाना हवी सूट ।

संक्रांत आली
घेऊन आनंदी रंग ।
बंटी ही आपला
पतंग उडवण्यात दंग ।
Sanjay R.

Monday, January 13, 2020

" आंबट गोड बोरं ".

गोड आंबट बोरं
वेचत होती पोरं ।

बालपण आठवलं
आलं डोळ्यापुढे सारं ।

घुसून कुणाच्या शेतात
तोडायचे पेरू आणि बोरं ।

कळलंच कुणाला तर
तयार खायला मार ।

मजा यायची खूप
सम्पलं आता सारं ।
Sanjay R.

Sunday, January 12, 2020

" अजून जगायचं मला "

तू बोलूच नको
मला आता बोलायचं आहे ।
तू बघूही नको
मला पण बघायचं आहे ।

काय करू काय नको
सगळंच तर करायचं आहे ।
वेळ नाही आता
अजून थोडं हसायचं आहे ।

लहानाचा झालो मोठा
मोठं अजून व्हायचं आहे ।
तो तिथं दारात उभा
खरंच का मरायचं आहे ।

नको नको थांब थोडा
जाऊन पुढे यायचं आहे ।
असलास तू मृत्यू जरी
थोडं मला जगायचं आहे ।
Sanjay R.

Saturday, January 11, 2020

" होशील का तू माणूस "

माणूस म्हणू कसा
तू सांग ना रे जरा ।
नाही तूझ्यात माणूस
म्हणू तुला कसा मी बरा ।

तुझ्यापेक्षा बघ
किडा मकोडा रे बरा ।
मन तुझं खोटं
नाही तू रे खरा ।

असा कसा रे तू
भासतो विद्वान जरा ।
माणुसकीचा नाही रे
गुण तुझ्यात खरा ।

हलते ते झाड
जेव्हा वाहतो वारा ।
मुळ देते मग आधार
भार सोसतात सारा ।

मूळ तुझे रे अधर
करतो तूच मारा ।
उद्धवस्त करून सोडतो
तू आपलाच पसारा ।

नको म्हणू तू माणूस
तू नाहीस रे बरा ।
कर विचार थोडा
होशील का तू माणूस जरा ।
Sanjay R.

Friday, January 10, 2020

" का दिली आम्हास खादी "

बापू तुम्ही आम्हास तेव्हा
का दिली हो ही अशी खादी ।
आम्हाला तर हवी
फक्त आणि फक्त आजादी ।।

नेते आमचे बघा कसे
चिकटले आहेत घेऊन गादी ।
भारताची तुमच्या बघा
झाली कशी हो बरबादी ।।

नाव तुमचे घेऊन कसे
मिरवतात हे मानवता वादी ।
म्हणतात सारे आम्ही
आहोत असेच सत्यवादी ।।

शुभ्र कपड्या आड बघा
आहेत कसे हे दहशतवादी ।
देश नको, लोक नको
कुठले हो हे समाजवादी ।।
Sanjay R.