Friday, January 10, 2020

" का दिली आम्हास खादी "

बापू तुम्ही आम्हास तेव्हा
का दिली हो ही अशी खादी ।
आम्हाला तर हवी
फक्त आणि फक्त आजादी ।।

नेते आमचे बघा कसे
चिकटले आहेत घेऊन गादी ।
भारताची तुमच्या बघा
झाली कशी हो बरबादी ।।

नाव तुमचे घेऊन कसे
मिरवतात हे मानवता वादी ।
म्हणतात सारे आम्ही
आहोत असेच सत्यवादी ।।

शुभ्र कपड्या आड बघा
आहेत कसे हे दहशतवादी ।
देश नको, लोक नको
कुठले हो हे समाजवादी ।।
Sanjay R.

" भ्रष्टाचार "

नाही ज्याला आचार
मनात क्षुद्र विचार ।

अंतरात होतो प्रचार
असतो खिसा लाचार ।

पसरतो पुढे हात चार
करून किती अत्याचार ।

सळसळतो भ्रष्टाचार
हा माणुसकीचा दुराचार ।

भरला सगळाच बाजार
साऱ्यास झाला आजार ।

नाही उरला उपचार
फक्त झेलायचे प्रहार ।
Sanjay R.

" हवे स्वातंत्र्य "

जिकडे तिकडे आवाज
हवे म्हणतात स्वातंत्र्य ।

शोधतो मी इथे आता
कोण भोगतो पारतंत्र्य ।

गांधी नेहरूंनी दिलं ते
नव्हतं का हो स्वातंत्र्य ।

आहुती दिली प्राणाची
होतं का निष्फळ सारं ।

परतून लावले परकीय
उघडून स्वातंत्र्याचे दार ।

घुमतात नारे अजूनही
कुठून आलं हे वारं ।

खरे खोटे कळले नाही
झाले जीवन एक भार ।
Sanjay R.

" लेकरू गुणाचे "

आई इतकं प्रेम
नसतं कुणाचं ।
लेकरू आवडतं
असतं बापाचं ।

कष्ट आई बापाचे
लाड होतात पोराचे ।
सर्वस्व लावतात
लेकरू किती गुणाचे ।

मोठं होत लेकरू
आई बाप म्हातारे ।
आधारच तुटतो
लेकराला काय त्याचे रे ।

एकाकी होतं जीवन
सोबत नसते कुणाची ।
वृद्धाश्रम असा जिथे
माणसं मोठ्या मनाची ।
Sanjay R.

" वर्हाडी साहित्य सम्मेलन 2020 "

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे सम्पन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय वर्हाडी साहित्य संमेलनात माझा सहभाग .
दिनांक 04.01.2020.