Friday, January 10, 2020

" लेकरू गुणाचे "

आई इतकं प्रेम
नसतं कुणाचं ।
लेकरू आवडतं
असतं बापाचं ।

कष्ट आई बापाचे
लाड होतात पोराचे ।
सर्वस्व लावतात
लेकरू किती गुणाचे ।

मोठं होत लेकरू
आई बाप म्हातारे ।
आधारच तुटतो
लेकराला काय त्याचे रे ।

एकाकी होतं जीवन
सोबत नसते कुणाची ।
वृद्धाश्रम असा जिथे
माणसं मोठ्या मनाची ।
Sanjay R.

" वर्हाडी साहित्य सम्मेलन 2020 "

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे सम्पन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय वर्हाडी साहित्य संमेलनात माझा सहभाग .
दिनांक 04.01.2020.



" विदर्भाची माती "

अशीच आहे
माझ्या विदर्भाची माती ।
फुलतात इथे
नाती आणि गोती ।
वाटेल तुम्हाला
वेगळी इथली रीती ।
पण ओलावा त्यात
बघा आहे किती ।
Sanjay R.

Friday, January 3, 2020

" अकाली पाऊस "

पावसाने अजून हो
सोडला नाही पिच्छा ।
घे म्हणा पूर्ण करून
उरल्या सुरल्या इच्छा ।

यंदा तर पावसाने
पीक गेले वाया ।
सांगा आता तुम्ही
पडू कुणाच्या पाया ।

नशीबच हे असं
काय आता करावं ।
शेती माती सोडून का
दुसरं काम धराव ।
Sanjay R.

" स्वीकार शुभेच्छांचा "

नको रंग नको गंध
तुझ्या या पुष्पगुच्छला ।
स्वीकारतो अंतरातून
तुझ्या या शुभेच्छेला ।
Sanjay R.