

सरतो आहे पुढे पुढे
आयुष्याचा एक एक टप्पा ।
सुटत चालली एक एक कडी
कोण उरेल करायला गप्पा ।
मी मी म्हणणारा प्रत्येक जण
तू चा घेतोय आधार ।
पेलवत नाही बघा आता
म्हातारपणाचा भार ।
कठीण किती जीवन हे
दिसे अंताला जीवनाचा सार ।
वाट बघतो बघत आकाशी
नेतील कोण मला चार ।
Sanjay R.
सून सासुवर भारी
होते सासू बिचारी ।
सत्ता सुनेची सारी
ही संसाराची वारी ।
बघून सून टीव्ही
होते कशी दुराचारी ।
अवतार सुनेचा बघून
सासू होते मग विचारी ।
Sanjay R.
भौ घरी न्हाई कांदा
झाला लय हो वांदा ।
भाव टेकले अभायाले
बेपारायचा होते धंदा ।
ज्यानं पिकवला त्याले
भेटला का हांडा ?
शेतकऱ्याच्या मालाले
दुसराच करते गंदा ।
ज्याची रायते मेहनत
गळ्यात त्याच्या फंदा ।
काय सांगाव बावा
पडते गळ्यावरच रंदा ।
Sanjay R.
माझे व्यासपीठ मासिक मुंबई डिसेंबर 2019 अंकात माझ्या " मी लाचार " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .