Monday, December 9, 2019

" प्रवास चाले अविरत "

मज जगण्याची ही कला झाली अवगत
जमले मला हे सारे सांगतो तुझ्याच सोबत ।

उगवतो सूर्य प्रवास चाले त्याचा अविरत
सायंकाळ होता मग विसावतो पर्वतात ।

बहरते रातराणी तिच्याच सुगंधात
बेधुंद होतो काळोख काळ्या अंधारात ।

सजीव निर्जीव सामील सारे या उत्सवात
बघतो दूर मी धावते आभाळ गगनात ।
Sanjay R.

Sunday, December 8, 2019

" आयुष्याचा पाढा "

दिवस रात्र अभ्यास करा
घेऊन डिग्री उपाशी मरा ।

नोकरी साठी तडफड करा
धंदा शेती की रिकामा बरा ।

काही तरी करून थोडे कमवा
लग्ना साठी ही चप्पल झिजवा ।

होत नाही सेटल तर वाढते वजन
डॉक्टरचे मग छान जमते भजन ।

आरोग्य चिंता त्यात मुलांचे शिक्षण
आयुष्य गेले बदलले नाही लक्षण ।

नातू पणतू सारेच जमा झाले पण
वृद्धाश्रमात हो कोणीच नाही आले ।

आठवत नाही आता शेवट काय झाले
सगळेच असून खांद्यावर कोणी नेले ।
Sanjay R.

" पाहिले मीच जाईल "

नाही जीवाची चिंता मला
जो तो म्हणतो मीच जाइल ।
नष्ट तुमचे जीवन करून
पृथ्वी तलावर मीच राहील ।
घाई मला साऱ्या दुनियेची
मालक सडकेचा, मीच जाईल ।
देऊन धडक तुम्हास मी
उभा आडवा मी पाडील ।
नियम सारे खिशात माझ्या
पैशांनी मी विकत घेईल ।
जीव तुमचा गेलाच तर
कोण माझे वाईट करील ।
चिंता असेल तुम्हास जीवाची
नका निघू हो बाहेर कोणी ।
मरून पडाल रस्त्यावर तर
पाजेल तुम्हा कोण पाणी ।
Sanjay R.

Wednesday, December 4, 2019

" अभंग "

मुखे गातो तुकोबांचा अभंग
सोबत संत महात्म्यांचा संग
चहूकडे दिसे ज्ञानियांचा रंग
हाती टाळ चिपड्या घेऊनि
भक्त झाला हरी नामात दंग
अंतरात वसे त्याच्या विठ्ठल
महिमा तुझीच देवा पांडुरंग
Sanjay R.

" जळतो तीळ तीळ "

झाली आता सांज वेळ
सम्पला सूर्याचा खेळ
होईल अंधाराचा मेळ
वाजते दुर कुठे शीळ
जळतो जीव तीळ तीळ
Sanjay R.