Monday, October 28, 2019

" करू स्वागत दिवाळीचे "

तेज प्रकाशाचे
छोट्याश्या पणतीचे ।
येई घेऊन सौख्य
वेचू क्षण आनंदाचे ।
सरु दे अंधार सारा
भाग्य उजळू दे जीवनाचे ।
हर्षोल्हासात करू स्वागत
सारे आपण दिवाळीचे ।
Sanjay R.

Saturday, October 26, 2019

" देवाला पत्र "

चला लिहू या देवाला पत्र
सांग म्हणावं आता
कधी थांबेल पावसाचे सत्र ।

धुवून पुसून झाले ना स्वच्छ
पुराच्या पाण्यापुढे
अश्रूही झालेत किती तुच्छ ।

घर गेले संसार तुटला
नाही छत डोक्यावर
देवा कारे असा तू रुठला ।

काय सांगू मी अजून तुला
देवा करतो तुझाच धावा
कर ना मदत तूच आता मला ।
Sanjay R.

Friday, October 25, 2019

" आली दिवाळी "

दिवाळीचा आज
पहिला दिवस ।
आहे आहे
आज धनतेरस ।

नरकचतुर्दशी आणि
होईल लक्षमीपूजन ।
आनंद उत्साहात
बघा सारेच जण ।

बलिप्रतिपदा आणि
मग भाऊबीज ।
ओवाळेल बहीण
रे भावा तुज ।

लाडू अनरसा खाऊ
चिवडा चकली ।
नवीन कपड्यात
हसेल रे छकुली ।
Sanjay R.

" प्रश्नाला असतो प्रश्न "

प्रश्नाला असतो प्रश्न
उत्तराला उत्तर ।
डोके विचारांचे घर
प्रश्न त्यात सत्तर ।
लागेल ठेच बघा
वाटेत सारेच पत्थर ।
कुणी मवाळ त्यात
कुणी बहुत कट्टर ।
वाट धरा सुखाची
शिंपडा थोडे अत्तर ।
सुखी सारेच होतील
आनंदाचे हेच उत्तर ।
Sanjay R.

Wednesday, October 23, 2019

" फुल पाखरू स्वच्छंदी "

मी असाच आहे
बघतो आनंद इतरांचा
होतो थोडा आनंदी ।
बघून दुःख मात्र
होतो दुःखी आधी ।
आहेच मी थोडा
परमानंदी ।
मात्र मनात माझ्याही
आहे एक धुंदी ।
नाहीच जमत मला
करायचे अंतराला बंदी ।
मान डोलावतो ना
असतो तो नंदी ।
मी पण होतो कधी
फुल पाखरू स्वच्छंदी ।
Sanjay R.