Tuesday, October 22, 2019

" लग्न "

लग्न एक विश्वासाचा बंध
आयुष्यभर दरवळतो सुगन्ध ।
वाट जरी असेल ही रुंद
फुलतो संसार करतो धुंद ।
जगतो जीवन मंद मंद
परंपराच ही देई आनंद ।
Sanjay R.

Monday, October 21, 2019

" चला करू या मतदान आज "

नेत्यांना तर सत्तेचा माज
नाही उरली कसलीच लाज ।
मिरवतात डोक्यावरती
भ्रष्टाचाराचा ताज
नाहीच यायचे हे असे बाज ।
दाखवू इंगा , पाडू गाज
चला करू या मतदान आज ।
Sanjay R.




Sunday, October 20, 2019

" अंत माणसाचा "

बापू तुम्ही महान संत
मंत्र तुमचा अहिंसेचा
पण माणूसच करतो
का माणसाचा अंत ।।

दहशतवाद नाव ज्याचे
विचार झाले हिंसेचे
राग द्वेष धर्मांधता कशी
पसरले सावट युद्धाचे ।।

निरपराधी देतो प्राण
उघड्यावर येतो संसार
नाही कुणाचा आधार
आकाशी हे कुठले निशाण ।।
Sanjay R.

Saturday, October 19, 2019

" आली दिवाळी "

झाली सुरू साफ सफाई
आली दिवाळी , करा घाई ।

गर्दी पाई रस्ते झाले जाम
दिवाळीचा किती तामझाम ।

दिवे पणत्या कपडे खरेदी
आभाळास टेकले सोने चांदी ।

मंदी चा हा दौर आला
खिशावरती महागाईचा घाला ।

फटाक्यांना सरकारी बंदी
गरिबांना कुठे दिवाळीची धुंदी ।
Sanjay R.

" ते आहे क्षितिज "

ते समोर दिसतंय ना
ते आहे क्षितिज ।
वाटतं किती जवळ
पण आहे किती दूर ।
सांगायची आई लहानपणी
ते ना आहे फार दूर ।
असा होऊ नकोस आतुर
आज वाटतं किती ते फितूर ।
नाहीच कुठे अस
जमिनीला टेकलेलं ।
आकाश दूरच असतं
अंतर त्यानं राखलेलं ।
मनही असच असतं
क्षणात इथे तर
माहीत नाही क्षणात कुठे ।
असतो नुसता आभास
त्यातच रामयचं ।
सागर दुःखाचा इथे
दुःख आपली विसरायचं ।
चल जाऊ थोडं पुढे
आहे अजून खूप जगायचं ।
Sanjay R.