आलं हे इंटरनेट
घुसलं घरात थेट ।
पाहिले थोडा जास्त
होता त्याचा रेट ।
म्हणालं होतो स्वस्त
करा थोडं वेट ।
दिवसाला एक जीबी
जिओ ने दिली भेट ।
मोबाईलच झाला आता
सर्वांचाच पेट ।
सुटता सुटत नाही
बंद झालेत गेट ।
चालणे बोलणे हसणे रडणे
साऱ्यांनाच हवे इंटरनेट ।
व्हर्चुअल चा जमाना
इथेच होतो मेट ।
Sanjay R.
Saturday, October 5, 2019
" आलं इंटरनेट "
Thursday, October 3, 2019
" बापूंची 150 वी जयंती "
मंत्र देऊन अहिंसेचा
केला सत्याग्रह स्वातंत्र्याचा ।
बापू तुम्ही महान किती
झालात राष्ट्रपिता या देशाचा ।
चालवली चळवळ स्वदेशीची,
प्रसार प्रचार केला खादीचा ।
अस्पृश्यता आणि स्वच्छता
बिमोड केला जातीयतेचा ।
प्रेरणा स्थानी तुम्हीच बापू
दिला कण कण आयुष्याचा ।
पाळायचे तत्व जे सांगितले तुम्ही
मार्ग खरा हाच जीवनाचा ।
Sanjay R.
" स्वप्न बघतो डोळ्यात "
बघतो डोळ्यात
तुझ्या मी स्वप्न ।
पण विसरलोच
कसे ते जपणं ।
कळते व्याकुळता
तुझ्या डोळ्यातली ।
सांगू कसा तुज
व्यथा मनातली ।
चंद्र नाही दूर पण
बघतो अंगणातून ।
अंतरात बघ माझ्या
नाही जाणार मनातून ।
Sanjay R.
" प्रतिक्षा "
जीवन आहे परीक्षा
असावी यशाची अपेक्षा ।
अपयश बाजू दुसरी
करायची थोडी प्रतीक्षा ।।
यश आपुल्या हाती
सोडा सारी निराशा ।
विजयी होऊच नक्की
घ्या मनाशी हीच दीक्षा ।।
Sanjay R.
Saturday, September 28, 2019
" बुरखा घुंघट "
बुरखा घुंगट
हवा कशाला ।
उन्हापासून
सौरक्षणाला ।
खवखवणार्या
नजरा किती ।
त्यांच्यापासून
कशी ही भीती ।
पूर्वा पारची
ही पद्धत कशी ।
स्त्री ला झाकून
ठेवायचे जशी ।
Sanjay R.