Monday, September 16, 2019

" ध्यास "

मनात एक ध्यास
डोळ्यात आभास ।
आठवण आली की
थांबतो मधेच श्वास ।
वेध घेतात मग कान
असतो एक प्रयास ।
यावा हळूच वारा आणी
पूर्ववत व्हावा श्वास ।
Sanjay R.

" निघालं आज ऊन "

निघालं आज ऊन
झालं का सगळं धून ।
आला सूर्य डोक्यावर
दिसते आभाळ अजून ।
मधेच लपतो सूर्य
झाला थंड थोडा लाजून ।
जा बाबा पावसा थोडा
पडलो आजारी भिजून ।
जगू दे आता तरी
सांग राहायचं किती निजून ।
Sanjay R.

Friday, September 13, 2019

" दूर नको जाऊस "

थांब ना ग सखे
नको दूर जाऊस ।

आभाळ आले भरून
येईल आता पाऊस ।

रस्ता हा वेडा वाकडा
नको ना तू धाऊस ।

सुटला वारा थंड
किती तुला हाउस ।

घे विसावा थोडा
दूर नको जाऊस

बसून बोल ना थोडं
एकटीच नको गाऊस ।

साथ हवी शब्दांची
वाट नको पाहुस ।
Sanjay R.

Thursday, September 12, 2019

" विसर्जन "

गणेशराव निघणार ना आता
झालेत दहा दिवस ।
इतकाच होता का हो आमचा
तुमच्या करिता नवस ।

किती छान गेलेत दिवस
आरती आणि प्रसदात ।
करमणार नाही हो मुळीच
तुमच्या विना या घरात ।

भाव भक्ती आनंद उत्साह
भरभरून दिला तुम्ही ।
म्हणून तर बाप्पा बाप्पा करतोय ना
इथे सारे आम्ही ।
Sanjay R.

Wednesday, September 11, 2019

" वाट काळजाची "

वाट या काळजाची
कशी कुठून कुठे जाते ।
येऊन तो हळूच वारा
जोरात मग हलवून जाते ।
आठवणी दडून त्यात
मनही कसे विसरून जाते ।
स्पर्श थोडा होताच मनाचा
आठवण उफाळून येते ।
मन होते उदास थोडे
आठवणींची आठवण होते ।
Sanjay R.