थांब ना ग सखे
नको दूर जाऊस ।
आभाळ आले भरून
येईल आता पाऊस ।
रस्ता हा वेडा वाकडा
नको ना तू धाऊस ।
सुटला वारा थंड
किती तुला हाउस ।
घे विसावा थोडा
दूर नको जाऊस
बसून बोल ना थोडं
एकटीच नको गाऊस ।
साथ हवी शब्दांची
वाट नको पाहुस ।
Sanjay R.
थांब ना ग सखे
नको दूर जाऊस ।
आभाळ आले भरून
येईल आता पाऊस ।
रस्ता हा वेडा वाकडा
नको ना तू धाऊस ।
सुटला वारा थंड
किती तुला हाउस ।
घे विसावा थोडा
दूर नको जाऊस
बसून बोल ना थोडं
एकटीच नको गाऊस ।
साथ हवी शब्दांची
वाट नको पाहुस ।
Sanjay R.
गणेशराव निघणार ना आता
झालेत दहा दिवस ।
इतकाच होता का हो आमचा
तुमच्या करिता नवस ।
किती छान गेलेत दिवस
आरती आणि प्रसदात ।
करमणार नाही हो मुळीच
तुमच्या विना या घरात ।
भाव भक्ती आनंद उत्साह
भरभरून दिला तुम्ही ।
म्हणून तर बाप्पा बाप्पा करतोय ना
इथे सारे आम्ही ।
Sanjay R.
कविता तुझ्या मौनाची
कथा ही जीवनाची ।
मौन तुझे निरंकाळ
शब्दांचा झाला दुष्काळ ।
नजरेला नजर नाही
कानावरती गजर नाही ।
आकाशाचे आभाळ झाले
ढगांमधून थेंब आले ।
सरसर सरसर ओले ओले
भिजून सारे चिंब झाले ।
Sanjay R.
बाप्पा निघाले परतीला
चला जाऊ या आरतीला ।
दिवस दहा आम्ही केली सेवा
आनंदाचा तुम्ही दिला मेवा ।
भाव भक्तीचा मनात भरला
राग द्वेष आता नाही उरला ।
प्रसाद मोदक प्रकार किती
उत्साहाच्या पेटल्या वाती ।
करू चला हो जयघोष आता
आरती गणेशाची गाता गाता ।
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या ।
Sanjay R.