Sunday, August 18, 2019

नजर दूर वाटेवर


फडफड तनात होते
तडफड मनात होते ।

काळजास चाहूल होता
धडधड उरात होते ।

नजर दूर वाटेवर
मनही आतुर होते ।

क्षण अधीर होता
डोळ्यात पूर येते ।
Sanjay R.

Saturday, August 17, 2019

" माझी कविता "

मनात माझ्या तू
सांगू कसे तुला ।
छळतेस किती कशी
स्वप्नात तू मला ।

आहेस तू कविता
शब्दांची तू सरिता ।
आहेस तूच मनात
म्हणून
फुलते ही कविता ।

श्रावणातली सर तू
क्षणात दूर जाते ।
परी अंतरात माझ्या
आठवण तुझीच राहते ।

भिजून चिंब धरा ही
हिरवे गीत गाते ।
पूर आठवणींचा बघ हा
नेत्राच्या कडेतून वाहते ।
Sanjay R.

" हवा गुलाबाचा संग "

रूप आणि रंग
हवा गुलाबाचा संग ।
मन मोहरले माझे
गुलाबात मी दंग ।

काय कुणाचा छंद
होतो मोगराही धुंद ।
कळी गुलाबाची झुले
संगे वारा वाहे मंद ।

सलतो काटा मनात
राहूनही तो झाडात ।
करून मन मोकळे
जाते सल क्षणात ।
Sanjay R.

Friday, August 16, 2019

" आव्हान "

पेलवत नाही आता
मनालाच मनाचे आव्हान ।
क्षणातच निसटून जाते
आणि गुंतते कुठेतरी भान ।
काळ होता तो एक
आठवण म्हणजे होती एक शान ।
अभ्यासाचे मात्र कसे सांगू
बुद्धीलाच ते आहे सारे ज्ञान ।
पुढ्यात पेपर येताच कसे
आठवायचे नाही पुस्तकाचे पान ।
निकाल पत्र बघून मग
स्वतःच स्वतःचा करायचो अपमान ।
कधी वाटत बरच आहे
विसरण्याची कलाही
नाही इतकी आसान ।
कधी त्यातूनही पूर्ण होतात
हवेत ते सारे अरमान ।
Sanjay R.

Thursday, August 15, 2019

यवतमाळ साहित्य मंच काव्य सम्मेलन

15 ऑगस्ट 2019 ला यवतमाळ येथे आयोजित काव्य सम्मेलनात मी माझी कविता सादर करताना