सर्व मित्र मंडळीस स्वतंत्रता दिवस आणि रक्षा बंधन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

" वंदे माँ तरम "
भक्ती करतो, करतो पूजा
सांगा कुठे हो आहे देव ।
भाव मनात माझ्या त्याचा
नाही मज कुणाचे भेव ।
असेल नसेल मंदिरात तो
श्रद्धा, विश्वास निरंतर ठेव ।
कर्ता करविता तोच आहे
अंतरात बघ तू तिथेच देव ।
माणसातला तू माणूस होऊन
जिवंत थोडी माणुसकी ठेव ।
तूच होशील माणूस असा की
दिसेल तुजला तुझ्यात देव ।
Sanjay R.