Friday, August 9, 2019

" दोस्तायची दोस्ती "

अंगत झाली पंगत झाली
दिसभर दोस्तायची मले
भाऊ मस्त संगत झाली

उखाने झाले पाखाने झाले
शायेतल्या जमान्यांचे मंग
तश्शेच सारे धिंगाने झाले

हरिक होता सर्यायलेच
मारामारी भांडणायचे
किस्से गाऊन झाले

निंगा म्हने आता सारे
घरी जाचा वकत आला
तोंडं सऱ्यायचे सुकून गेले ।

दोस्तायन दोस्तायले
हात हलवून जाय जाय केले ।

Sanjay R.

Thursday, August 8, 2019

" तूच माझी प्रीत "

कळतंय मला तुझं गं
माझ्यावरचं हे रुसणं ।
डोळ्यात माझ्या बघत
गालातल्या गालात हसणं ।
मलाही वाटत थोडं
असच तू थोडं रुसावं ।
हसताना गालावर तुझ्या
त्या गोड खळीला बघावं ।
आकाशातून सरसर येणाऱ्या
पावसात थोडं भिजावं ।
गरम गरम चहा आल्याचा
पीत हितगुज थोडं करावं ।
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये
प्रीती ला थोडं फुलवावं ।
घेऊन तुझा हात हातात
मनाला हळुवार झुलवावं ।
प्रीत माझी ग तूच प्रिये
तुझ्या विना नाही रंग ।
सोडू नकोस कधीच मला
हवा मला तुझाच संग ।
Sanjay R.

Wednesday, August 7, 2019

" सरसर सरी "

सरसर सरसर
कोसळतात सरी ।
रात्र नशिली आणि
सोबतीला तुं गं परी ।

झाले धुंद तनमन
वाटे घ्यावे धुंद भिजून ।
अलगद टिपून घ्यावे
थेंब ओठावरचे अजून ।

हात घेऊन हातात
कवेत तुजला घ्यावे ।
वाटे रेशमी स्पर्शात
एकरूप तुझ्यात व्हावे ।
Sanjay R.

Tuesday, August 6, 2019

" पाच ऑगस्ट 2019 नवा इतिहास "

अखंड माझा हा भारत
काश्मीर ते कन्याकुमारी ।
फडकला तिरंगा आता
उत्साह फुलला दिशा चारी ।

स्वप्न गेलेत तुटून त्यांचे
नवाबी थाटात जगणे ज्यांचे ।
आतंक दहशत वादच सम्पला
सांडवू रक्त आता घुसखोरांचे ।

सुजलाम सुफलाम देश आमचा
काश्मीर आमचे नंदनवन ।
हसेल बगडेल सारेच आता
लाल चौकात फुलवू वृन्दावन ।
Sanjay R.

Monday, August 5, 2019

" गारुडी "

मांडायचा जेव्हा गारुडी
नागोबाचा खेळ।
काळायचंच नाही मग
गेला किती वेळ ।
साप मुंगूस ची लढाई
आमिष तो दाखवायचा ।
उत्सुकता इतकी मनात
त्यातच तो भुलवायचा ।
फणा काढलेला नाग
पुंगी च्या नादावर डोलायचा ।
दाखवून भीती गारुडी
खिशातले पैसे काढायचा ।
दर्शन देऊन नागाचे
धोपटी आपली भरायचा ।
मुंगूस सापाची लढाई
मुद्दामच तो विसरायचा ।
Sanjay R.