Wednesday, August 7, 2019

" सरसर सरी "

सरसर सरसर
कोसळतात सरी ।
रात्र नशिली आणि
सोबतीला तुं गं परी ।

झाले धुंद तनमन
वाटे घ्यावे धुंद भिजून ।
अलगद टिपून घ्यावे
थेंब ओठावरचे अजून ।

हात घेऊन हातात
कवेत तुजला घ्यावे ।
वाटे रेशमी स्पर्शात
एकरूप तुझ्यात व्हावे ।
Sanjay R.

Tuesday, August 6, 2019

" पाच ऑगस्ट 2019 नवा इतिहास "

अखंड माझा हा भारत
काश्मीर ते कन्याकुमारी ।
फडकला तिरंगा आता
उत्साह फुलला दिशा चारी ।

स्वप्न गेलेत तुटून त्यांचे
नवाबी थाटात जगणे ज्यांचे ।
आतंक दहशत वादच सम्पला
सांडवू रक्त आता घुसखोरांचे ।

सुजलाम सुफलाम देश आमचा
काश्मीर आमचे नंदनवन ।
हसेल बगडेल सारेच आता
लाल चौकात फुलवू वृन्दावन ।
Sanjay R.

Monday, August 5, 2019

" गारुडी "

मांडायचा जेव्हा गारुडी
नागोबाचा खेळ।
काळायचंच नाही मग
गेला किती वेळ ।
साप मुंगूस ची लढाई
आमिष तो दाखवायचा ।
उत्सुकता इतकी मनात
त्यातच तो भुलवायचा ।
फणा काढलेला नाग
पुंगी च्या नादावर डोलायचा ।
दाखवून भीती गारुडी
खिशातले पैसे काढायचा ।
दर्शन देऊन नागाचे
धोपटी आपली भरायचा ।
मुंगूस सापाची लढाई
मुद्दामच तो विसरायचा ।
Sanjay R.

Sunday, August 4, 2019

" मित्र महान "

मैत्री म्हणजे विश्वास
नेहमीच मित्रांचा ध्यास ।
मैत्री जीवनाचा आधार
नाही वाटत कशाचाच भार ।
मैत्री म्हणजे आपलेपणा
अशक्य सारेच मित्रांविणा ।
मित्र म्हणजे मोठी हिम्मत
दूर झाल्यावर कळते किंमत ।
मित्र आयुष्यातले सुख
जाणवणार नाही दुःख ।
मित्र आठवणींचा भाग
आठवतात येताच जाग ।
मित्रांविना हलत नाही पान
मैत्री मित्रांची खरच महान ।
Sanjay R.

Friday, August 2, 2019

" हो विवेकी थोडा "

हो तू थोडा विवेकी
मी होईल आशावादी ।
ठेवुनी चित्त शांत
विवेक करील कार्य ।
अशांत होशील जेव्हा
मिळेल तुलाच धैर्य ।
होशील तू विजयी
आशावाद माझा ठाम ।
मनोकामना पूर्ण होतील
विवेकाचे हेचि काम ।
Sanjay R.