Wednesday, July 31, 2019

" तन वाहाडल वावरात "

पाऊस पडून रायला
करतं का वो भजे ।
झकास करतं व तू
कापतो कांदे मायमाजे ।
झडच लावली पावसानं
होईन का आता सरदी ।
डॉकतर खुश किती पाय
दवाखान्या मंदी लैच गरदी ।
तन वाहाडल वावरात
मजूर न्हाई भेटत कोनी ।
आपल्यालेच करा लागन
संग घेजो पोरं दोनी ।
जाऊ दे न आता शाईच
चार दिस जाईन त्यायचे ।
चार पोते पिकन जास्ती त
पैसे देऊ मंग टीवशन चे ।
जास्ती इचार तू करू नको
हात जरासा आवर लवकर ।
देवानं देल जास्ती काई त
पोटात जाईन भाकर चोतकर ।
Sanjay R.

Monday, July 29, 2019

" म मराठीचा "

बघा म मराठी चा
शब्द किती सुंदर हा ।
लिहितो बोलतो वाचतो
शब्द संग्रह मायबोलीचा हा ।
आई जनक या बोलीची
वर्णावी काय महिमा तिची
बाप भाऊ बहीण सारे
रुजवती नाती जन्माची ।
मित्र मैत्रिण शब्द जीवाचे
ऋणानुबंध आयुष्याचे ।
सुंदर निर्मळ आनंद
सोबती सारे या जन्माचे ।
मराठीची गाथा अफाट
भावार्थ शब्दांचा विशाल ।
ग चा गा होतो जेव्हा
होते थोडी मग धमाल ।
मी मराठी अभिमान माझा
ज्ञानियांचा ज्ञानेश्वर ।
सामावला संसार इथेच सारा
म्हणता ई चा ईश्वर ।
शब्दांची नाही उणीव काही
बरळतो कुणी काही काही ।
मराठीचे तर वैभव मोठे
डंका तिचा दिशा दाही ।
Sanjay R.

" रिमझिम रिमझिम बरस रे आता "

व्यापल आभाळ ढगांनी
सुरुवात केली पावसानी ।
रिमझिम रिमझिम बरसतो आता
पाणी वाहतेय नाल्यांनी ।
हिरवी हिरवी झाडं हसली
हलताहेत कशी झोक्यांनी ।
आलास आता बरे झाले
अडवलं तुला कुणी धोक्यानी ।
पड आता तू रे खूप पड
भरू दे नदी तुझ्या पाण्यानी ।
आली होती आसवं डोळ्यात किती
तुझ्या या हट्टी वागण्यांनी ।
पड रे आता हवा तितकाच
आनंद फुलू दे तुझ्या येण्यानी ।
Sanjay R.

Sunday, July 28, 2019

" यश अपयश "

" यश अपयश "
मेहनतीचे फळ
देईल जीवनात यश ।
आळस नेईल दूर
मिळेल अपयश ।
क्षण आनंदाचे
यशाचा पाया ।
अपयश दाखवी
दुःखाची काया ।
यश अपयश दोन
नाण्याच्या बाजू ।
नका बघू वळून
जायचे पुढे अजून ।
Sanjay R.

Saturday, July 27, 2019

" पाऊस आला "

आला आला
पाऊस आला ।
परिसर सगळा
ओला झाला ।
रान हिरवे आणि
वारा थंड झाला ।
जाऊ या आता
शेतात कामाला ।
Sanjay R.