हाल लय आता बेकार
न्हाई पावसाले धार ।
काय अभायाचा इचार
खाली खाली दिशा चार ।
उनाचा झेलतो मी मार
पाहू कोनाचा अधार ।
अंतरात होते वार ।
करा मले तुमी सार ।
Sanjay R.
हाल लय आता बेकार
न्हाई पावसाले धार ।
काय अभायाचा इचार
खाली खाली दिशा चार ।
उनाचा झेलतो मी मार
पाहू कोनाचा अधार ।
अंतरात होते वार ।
करा मले तुमी सार ।
Sanjay R.
गरिबाला असतात कष्ट
सारेच कसे रे इथे दुष्ट ।
देवा मजवर का रे तू रुष्ट
सारेच तर इथे आहेत भ्रष्ट।
अन्नाचा काय महिमा
कुणी उपाशी
तर कुणी धष्टपुष्ट ।
नशीब माझेच का असे
उपसतो नुसतेच कष्ट ।
गरिबीचा कलंक माथी
स्वप्न झालीत लुप्त ।
देवा.....
नसेल मार्ग कुठलाच तर
टाक ना करून मला नष्ट ।
Sanjay R.
चाले मनात ध्यास
गुरू माझा श्वास ।
ज्ञानी करून सोडिले
जीवनी तेचि प्रयास ।
गुरू विना मार्ग हा
असता गेला लयास ।
महिमा गुरूंची माझ्या
जाहले जीवन खास ।
अर्पितो चरणी गुरूंच्या
श्रद्धेची मी आरास ।
Sanjay R.
काऊन का भाऊ यंदा
मारली पावसानं दांडी ।
मिरवत लय होती आता
गेली उडून माही झंडी ।
पै पै जोडून , दागिना मोडून
केली जमा म्या रकम ।
हात पाय जोडून आन
कर्ज काढून घेतलं बियानं ।
कसं होईन आता सांगा
सावकार बसन का बोकांडी ।
तयारी लेकीच्या लग्नाची
पर होईन उलार बंडी ।
पावसाचं भाऊ आता
रायलं न्हाई खरं ।
मेलो गिलो ना बावा
त टाकजा एक दोन हारं ।
Sanjay R.
होईल का घोषित दुष्काळ
जाईल निघून पावसाळा ।
झाले कुठे पाणीच पाणी
कुठे अजूनही सूर्याच्या झळा ।
गेले वाहून शेत कुठे तर
गेला वाळून कुठे मळा ।
झाले अनिश्चित सारेच आता
दूर नाही तो दिवस काळा ।
Sanjay R.