Monday, July 1, 2019

" पावसाची वर्दी "

झाकला आज सूर्य
केली आभाळानी गर्दी ।
रिमझिम बरसल्या सरी
पावसाची मिळाली वर्दी ।
सरला उन्हाळा आता
चला करू छत्री एक खरेदी ।
भिजून थोडं घेऊ आता
होईल मग भिजल्याने सर्दी ।
जपून भिजायचे थोडे
झिंगतात इथेच बहुत ते दर्दी ।
सिझन कमाईचा आला
जायची डॉक्टर होईल जलदी ।
Sanjay R.

Sunday, June 30, 2019

" रिमझिम पाऊस "

रिमझिम झाला पाऊस
आनंदी आनंद झाला ।

वृक्ष वेली हर्षित सारे
रंग हिरवा धरतीला ।

गीत मधुर पक्षी गाती
रंग काळा आभाळाला ।

पेरणीची लगबग आता
अंकुर फुटतील शेताला ।

सरसर सरसर सरी येऊ दे
दे उधाण या उत्साहाला ।
Sanjay R.

Saturday, June 29, 2019

” राधा “

सूर बासरीचे पडता कानी
अधीर होते राधा मनी ।
शोधत निघते यमुना तीरी
प्रेमात पडते राधा गोरी ।
सखा सावळा राधेचा हट्ट
नाते दोघातले किती घट्ट ।
राधे विना कृष्ण कसा तो
राधेसाठी बासरी गातो ।
Sanjay R.

” गीत सुरांचे “

मुरली वाजे राधा नाचे
मन बेधुंद गीत सुरांचे ।
सळसळ वारा मधुर धारा
फुलून गेला निसर्ग सारा ।
मन मोहक कृष्ण सावळा
मुग्ध राधा रंग वेगळा ।
सुरांची ती मैफिल सजली
कृष्णा सांगे राधा भिजली ।
Sanjay R.

" निघाली माऊलीची वारी "

निघाली पंढरपुरास
माऊलीची वारी ।
दुमदुमला आवाज मुखी
विठ्ठल विठ्ठल, जय हरी ।
नाद चिपळ्यांचा संगे
भगवी पताका खांद्यावरी ।
मनी भाव भक्तीचा
पावले पंढरीच्या वाटेवरी ।
ओढ लागली दर्शनाची
विठ्ठल उभा कर कटावरी ।
माय रुकमाई मागे उभी
लोटला जन इंद्रायणी तीरी ।
अवघा आनंद ओसंडला
विठ्ठलमय झाली पंढरी ।
विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल
दिसे मजला तो दिशा चारी ।
जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल ।
Sanjay R.