Tuesday, June 11, 2019

" लोट वाहू दे माझ्या दारी '

येतील का आज
पावसाच्या सरी ।
वाट तुझी पाहती
सारेच भीरी भीरी ।

कहर या गर्मीचा
सम्पव आता तरी ।
नक्षत्र जाइल लोटून
दे आभाळाची वारी ।

हट्टी किती रे तू पावसा
कोरड्या दिशा चारी ।
वेळ पेरणीची आता
नजर लागली तुझ्या वरी ।

माती पुकारते तुला
भिजव तिला थोडे तरी ।
गंध मातीला येऊ दे
लोट वाहू दे माझ्या दारी ।
Sanjay R.

Saturday, June 8, 2019

" पाणीच नव्हते भिजायला "

उभे होतो सारे
काल सात तारखेला ।
करायचे होते वंदन
रिमझिम रिमझिम पावसाला ।
डोळे होते आकाशात
ढग काळे बघायला ।
हळूच आला एक ढग
सलामी आमची घ्यायला ।
उत्सुक होतो आम्ही
जोरात टाळ्या पिटायला ।
थेंब दोन थेंब सांडले कुठे
पाणीच नव्हते भिजायला ।
Sanjay R.

Wednesday, June 5, 2019

" बरस रे पावसा "

बरस रे पावसा
जाईल जीव आता ।
गर्मी ने झालो बेजार
वाचव तूच आता ।

पाणी पाणी
करतात सारे ।
काळे होऊ दे
आभाळ सारे ।

टाक भिजवून
धरा सारी ।
पालवी फुटू दे
मनात न्यारी ।

नदी नाले तलाव सारे
टाक थोडे भरून ।
थेंब थेंब पाणी
पाड ना तू वरून ।

होऊ दे बरसात
भिजव थोडे अंग ।
बळीराजाला हवा
तुझाच रे रंग ।
Sanjay R.

Saturday, June 1, 2019

" पाणी पाणी "

पाणी पाणी
करायचं काय
सांगा कोणी ।

पाण्याविना
जीवन कसं
जगायचं कोणी ।

ढग आकाशात
पाणी जमिनीत
आम्ही ऋणी ।

डोळयांत बघा
एकच थेंब
तरळते पाणी ।

झाडे लावा
पाणी अडवा
सांगा कोणी ।

उरतील नाहीतर
दफन करायला
नुसत्या खाणी ।
Sanjay R.

Friday, May 31, 2019

" तंबाकू चुना '

पाण्यानं थोडं  बाबू
तोंड तू धुना ।
देना सोडून आता
तंबाकू चुना ।
सवयच बेकार
नाही तुझा गुन्हा ।
कॅन्सर नि गेला तं
दिसशील का पुन्हा ।
सोडून दे आता
तंबाखू चुना ।
Sanjay R.